मुलींच्या घटत्या जन्म प्रमाणाची कारणे शोधा; गर्भलिंग निदानाच्या दलालांवर सीसीटीव्हीची नजर-आ.डॉ.नीलम गोऱ्हे
लातूरच्या आढावा बैठकीत आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश; जन्मलिंग गुणोत्तराचा तालुकानिहाय अभ्यास, सीसीटीव्हीसाठी आमदार निधीतून मदतीची तयारी लातूर जिल्ह्यात मुलींच्या घटत्या जन्मप्रमाणाची कारणे शोधण्या साठी आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य विभागाला निर्देश. बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या दलालांवर सीसीटीव्हीची नजर, सोनोग्राफी केंद्रांच्या अचानक तपासण्या, १७० आशा सेविकांना विशेष प्रशिक्षण आणि पोलिस- आरोग्य विभागाच्या समन्वयावर भर मुलींच्या घटत्या जन्मप्रमाणामागचे गुपित शोधा; गर्भलिंग निदानाच्या दलालांवर सीसीटीव्हीचा वॉच लातूर ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.३० ऑक्टोबर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मुलींचे जन्मप्रमाण कमी असण्याची कारणे सखोलपणे शोधावीत. बेकायदा गर्भलिंग निदानासाठी महिलांना नेणाऱ्या दलालांचे जाळे उघड करण्यासाठी आरोग्य विभागाने पोलिसांच्या समन्वयाने काम करावे.संशयास्पद सो...

