मक्केजवळ ड्रोन हल्ल्याने भारताची चिंता; सौदी अरेबियाच्या समर्थनार्थ भारताचे ठाम वक्तव्य
भारताने सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वासह मक्केच्या सुरक्षेबाबत व्यक्त केली गंभीर चिंता नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : (सद्वार्ता) मक्केजवळ ड्रोन हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाला भारताने पाठिंबा दर्शवला असून, नागरिकांचे जीव आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी बुधवारी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना मक्केजवळ घडलेल्या ड्रोन घटनेबाबत भारत अत्यंत चिंतित असल्याचे सांगितले. सौदी अरेबियाच्या सार्वभौम भूभागावर होणारे हल्ले तसेच नागरिक आणि पायाभूत सुविधांना धोका निर्माण करणाऱ्या कारवायांचा भारत निषेध करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. जायसवाल यांनी मक्केच्या विशेष धार्मिक महत्त्वाकडेही लक्ष वेधले. जगभर...

