Wednesday, November 11

Tag: #NarhariZirwal

प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात एफडीएचे चार अधिकारी निलंबित; २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी – मंत्री नरहरी झिरवाळ
Maharashtra, mumbai, Politics

प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात एफडीएचे चार अधिकारी निलंबित; २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी – मंत्री नरहरी झिरवाळ

दोन कंपन्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर राज्य सरकारची मोठी कारवाई अन्न सुरक्षा कारवाईत कायद्याचे पालन, प्रशासकीय उत्तरदायित्वाला प्राधान्य मुंबई,दि.३० ऑक्टोबर २०२६ : प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात झालेल्या कारवाईची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची भूमिका आणि प्रशासकीय कार्यपद्धतीतील अनियमितता यांची गंभीर दखल घेत या प्रकरणात राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आणखी २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याची कारवाई केली आहे. एकूण २५ अधिकारी प्रशासकीय कारवाईच्या कक्षेत आहेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. ठाणे येथील मेसर्स हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी आणि मावळ तालुक्यातील मेसर्स सोएक्स इंडिया प्रा.लि.या कंपन्यांवर केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका...