Wednesday, November 11

पंढरपूर कॉरिडॉर बाधितांना मोठा दिलासा!१२ नोव्हेंबर पासून भक्त निवासात पंढरपूर कॉरिडॉर बाधितांना मोठा दिलासा!१२ नोव्हेंबरपासून भक्त निवासात भूसंपादनाचे कार्यालय; आठवड्यातून तीन दिवस कामकाज कार्यालय; आठवड्यातून तीन दिवस कामकाज

या कार्यालयाचे कामकाज दर आठवड्याला मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस चालणार आहे.त्यामुळे कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना आपल्या भूसंपादनविषयक अडचणी, दावे आणि हरकती मांडण्यासाठी आता सोलापूरला जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना नुकसानभरपाई संदर्भातील दावे,आवश्यक कागदपत्रे,पुरावे तसेच हरकती सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भूसंपादनासंदर्भात नोटीस प्राप्त झालेल्या संबंधित मालमत्ता धारकांनी नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत आपले म्हणणे मांडणे आवश्यक आहे. संबंधित नागरिक स्वतः उपस्थित राहून किंवा अधिकृत प्रतिनिधी अथवा वकिला मार्फत आपले म्हणणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात.

IMG_20261106_133905


सोलापूरच्या फेऱ्या वाचणार; नागरिकांना दिलासा

भूसंपादनासंदर्भातील कामांसाठी यापूर्वी बाधित मालमत्ताधारकांना सोलापूर येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ, प्रवासाचा खर्च आणि अनावश्यक धावपळ सहन करावी लागत होती.आता पंढरपुरातच तात्पुरते कार्यालय सुरू होत असल्याने नागरिकांची ही गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

विशेषतः कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या स्थानिक मालमत्ता धारकांना नुकसानभरपाई, कागद पत्रांची पूर्तता आणि हरकती नोंदविण्यासाठी प्रशासनाशी थेट संपर्क साधणे अधिक सोयीचे होणार आहे.

भूसंपादन प्रक्रियेत आपल्या मालमत्तेसंदर्भातील योग्य दावे आणि पुरावे वेळेत सादर करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्या नागरिकांनी ३० दिवसांची मुदत लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रांसह आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत नागरिकांना स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे तात्पुरते कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कार्यालयाचे ठिकाण: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे भक्त निवास, पंढरपूर कार्यालय: भूसंपादन अधिकारी क्रमांक ३ यांचे तात्पुरते कार्यालय
कामकाजाचे दिवस: मंगळवार, बुधवार आणि गुरुवार .हरकती व दावे: नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *