दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला द्या साथ,अवघ्या ५० रुपयांत खरेदी करा आकर्षक मेणपणत्या; स्वावलंबनाच्या दिशेने उजळवा आशेचा दीप
दहा मेणपणत्या फक्त ५० रुपयांत! पंढरपूरच्या दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला साथ देण्याची संधी पंढरपूरच्या शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी आकर्षक मेणपणत्या व मेणबत्त्या तयार केल्या आहेत. १० मेणपणत्यांचे पाकीट फक्त ५० रुपयांत उपलब्ध असून, खरेदीतून विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाला बळ देण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष मुन्नागिर गोसावी यांनी केले आहे. दिव्यांगत्वावर मात करत कलेतून स्वावलंबनाची भरारी! पंढरपूर | dnyanpravahnews : अंधारावर मात करून प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिव्यांची निर्मिती आता दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कुशल हातांतून होत आहे. पंढरपूर येथील लायन्स क्लब पंढरपूर यांच्या अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला कौशल्याची जोड देत विविध प्रकारच्या आकर्षक मेणपणत्या आणि मेणबत्त्य...

