Thursday, October 29

Tag: #आरोग्यविषयकबातम्या

137 कर्करोगाच्या औषधांवरील नफ्याच्या मर्यादेत सुधारणा सुधारित किमती 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील
Maharashtra, mumbai

137 कर्करोगाच्या औषधांवरील नफ्याच्या मर्यादेत सुधारणा सुधारित किमती 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील

137 कर्करोगाच्या औषधांवरील नफ्याच्या मर्यादेत सुधारणासुधारित किमती 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील PIB Mumbai,नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2026- रसायन आणि खते मंत्रालयातील औषध निर्माण विभागांतर्गत येणाऱ्या ‘राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने’ (NPPA) जनहितार्थ 137 ठरवून दिलेल्या बिगर-अनुसूचित कर्करोगविरोधी औषधांवर ‘व्यापार नफा मर्यादा सुसूत्रीकरण’ (ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन - TMR) लागू केले आहे. यामागचा मुख्य उद्देश, व्यापाऱ्यांचा अतिरिक्‍त नफा नियंत्रणात आणणे, कर्करोगावरील उपचार अधिक परवडणारे बनवणे आणि या औषधांची उपलब्धता सुलभ करणे हा आहे. सध्याच्या किमतींच्या रचनेनुसार, या निर्णयामुळे संबंधित कर्करोगविरोधी औषधांचे कमाल किरकोळ मूल्य (MRP) 70 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.हा निर्णय NPPA ने 2019 मध्ये राबवलेल्या प्रायोगिक TMR उपक्रमाच्या यशावर आधारित आहे. त्या उपक्रमांतर्गत...