पंढरपूरमध्ये पाणीटंचाईचे सावट! शुक्रवारपासून एक दिवसाआड पाणी;तुमचा भाग कोणत्या दिवशी?
पंढरपूर शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर २०२६ पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे.रेल्वे रुळा खालील आणि रेल्वे रुळावरील भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर. पाणी जपून वापरण्याचे पंढरपूर नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन. पंढरपूरकरांनो,पाणी जपून वापरा १६ ऑक्टोबरपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचा निर्णय पंढरपूरमध्ये पाणीबचतीची कसोटी! आता एक दिवसाआड नळाला पाणी; नागरिकांनीही जबाबदारी ओळखण्याची वेळ पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑक्टोबर :पाणी हे केवळ नैसर्गिक साधन नाही तर प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जगण्याचा आधार आहे. मात्र पावसाची कमतरता आणि मर्यादित पाणीसाठा यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याची वेळ आता पंढरपूर शहरावर आली आहे. पंढरपूर नगरपरिषदेने जाहीर निवेदनाद्वारे शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ पासून शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा न...

