Thursday, October 29

Tag: #तरुणांचेभविष्य

स्पर्धा परीक्षेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची?
Editorial, संपादकीय

स्पर्धा परीक्षेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची?

पदवी मिळाली, वर्षे गेली; तरी नोकरी नाही! महाराष्ट्रातील तरुणांच्या संघर्षाला जबाबदार कोण? परीक्षा, आंदोलन आणि अनिश्चित भविष्य; स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेत बदल कधी? एका परीक्षेसाठी अनेक वर्षे; पण निकालाची खात्री नाही! एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाची कल्पना करा. मुलगा किंवा मुलगी पदवीचे शिक्षण पूर्ण करते. त्यानंतर सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होते. आई-वडील घरखर्चाला कात्री लावतात, शेतीतून मिळणारे उत्पन्न किंवा पगारातील काही रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवतात. पुस्तके, क्लासेस, वसतिगृह, प्रवास आणि परीक्षांचे शुल्क यावर खर्च होतो. एक वर्ष जाते, दुसरे वर्ष जाते, तिसरेही वर्ष संपते. परीक्षा कधी जाहीर होणार, भरती कधी पूर्ण होणार, निकाल कधी लागणार आणि नियुक्तीपत्र कधी मिळणार, याची उत्तरे मात्र अनिश्चित राहतात. या काळात वय वाढते, आर्थि...