Thursday, October 29

Tag: #दूधउत्पादकशेतकरी

दुष्काळग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी आठ दिवसांत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा रास्ता रोको आंदोलन
Maharashtra

दुष्काळग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी आठ दिवसांत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा रास्ता रोको आंदोलन

मंगळवेढ्यात ४५ गावांतील पशुपालक संकटात; १,३५० शेतकऱ्यांचा इशारा, आठ दिवसांत चारा द्या अन्यथा रास्ता रोको मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा व पाणी उपलब्ध करावे अन्यथा आठ दिवसांत रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा १,३५० दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला. मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या ४५ गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आठ दिवसांनंतर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांचे प्रतिनिधी तथा पुरवठा निरीक्षक नवनाथ चव्हाण यांच्याकडे बुधवार दि.१४ ऑक्टोबर लेखी निवेदन सादर केले.या निवेदनावर १,३५० शेतकऱ्यांच्या सह्या आ...