Wednesday, October 28

Tag: #सामाजिकपरिवर्तन

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!
Maharashtra, mumbai

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!

पुण्यातील स्त्रीवादी साहित्य संमेलनात मी का लिहिते? परिसंवादातून सात लेखिकांनी मांडल्या लेखनप्रेरणा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांचे लेखन सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरण्याची गरज व्यक्त केली. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क,दि. २४ ऑक्टोबर : अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, ग्रामीण आणि बहुजन स्त्रियांच्या जगण्याला शब्द देण्यासाठी, स्त्रीवादाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी आणि मूक प्राण्यांच्या वेदना समाजासमोर आणण्यासाठी आम्ही लिहितो, अशा विविध लेखनप्रेरणांचा उलगडा पुण्यातील स्त्रीवादी साहित्य संमेलनात झाला. ‘मी का लिहिते? या विशेष परिसंवादात सात लेखिकांनी आपल्या लेखन प्रवासातील अनुभव मांडत साहित्य हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून सामाजिक वास्तवाची नोंद घेणारी आणि परिवर्तनाची दिशा दाखवणारी कृती असल्याचे अधोरेखित केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर ...