Wednesday, October 28

Tag: #1980Trend

१९८० चा ट्रेंड की गोपनीयतेचा धोका?; फोटो एडिट करणाऱ्या थर्ड पार्टी ॲप्सपासून सावध राहण्याचे ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन
Cyber Crime, Legal Awareness

१९८० चा ट्रेंड की गोपनीयतेचा धोका?; फोटो एडिट करणाऱ्या थर्ड पार्टी ॲप्सपासून सावध राहण्याचे ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन

एक फोटो अपलोड करताना फक्त चेहरा जात नाही! ८० च्या ट्रेंड’वर ॲड.चैतन्य भंडारी यांचा गंभीर इशारा १९८० च्या दशकातील फोटो ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल; थर्ड पार्टी ॲपवर फोटो अपलोड करण्याच्या धोक्याबाबत ॲड. चैतन्य भंडारी यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. धुळे | ज्ञानप्रवाह न्यूज : सोशल मीडियावर सध्या जुन्या काळातील छायाचित्रांसारखा लूक देण्याचा, विशेषतः १९८० च्या दशकाचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाईपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण आपले फोटो विविध थर्ड पार्टी ॲप्लिकेशनवर अपलोड करून त्यांना जुन्या काळातील लूक देत आहेत.मात्र हा ट्रेंड फॉलो करताना वैयक्तिक गोपनीयतेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा ॲड.चैतन्य भंडारी यांनी दिला आहे. आज सोशल मीडियावर एखादा फोटो वेगळ्या स्टाईलमध्ये तयार करून घेणे अत्यंत सोपे झाले आहे. संबंधित ॲपमध्ये फोटो अपलोड करून व...