नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेत ५ टन कचरा संकलित;दर बुधवारी श्रमदान अभियान राबविणार – मुख्याधिकारी महेश रोकडे
चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेत ५ टन कचरा संकलित;दर बुधवारी श्रमदान अभियान राबविणार -मुख्याधिकारी महेश रोकडे पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.४ नोव्हेंबर २०२६ : पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानास विविध सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक संस्थांसह वारकरी संप्रदायातील महाराज,विद्यार्थी, स्वयंसेवक, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोहिमे दरम्यान तब्बल ५ टन कचरा संकलित करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. पंढरपूर नगरपरिषद,नगरपरिषद शाळा क्रमांक ६ व ७,वृक्षदाई ग्रुप पंढरपूर,प्राथमिक आश्रमशाळा पंढरपूर तसेच कोळगाव,घारगाव, घोटवी,कोथूळ,चिखली,अस्तगाव, वडाळी,भा...

