मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे;आईसोबत वडील आणि संपूर्ण कुटुंबाचे समुपदेशन करा : डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे जिल्ह्यात मुलींचे जन्मनोंदणी गुणोत्तर ८८२ वर; बेकायदा गर्भलिंग निदानावर कठोर कारवाई, प्रलंबित खटल्यांचा पाठपुरावा आणि ऊसतोड महिलांच्या आरोग्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच! वडिलांसह संपूर्ण कुटुंबाचे समुपदेशन करा : डॉ. नीलम गोऱ्हे पुण्यात मुलींचे जन्मनोंदणी गुणोत्तर घटले; बेकायदा गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या सूचना पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क ,दि. २७ ऑक्टोबर २०२६ : मुलींच्या जन्माचे स्वागत केवळ समाजातच नव्हे, तर प्रत्येक कुटुंबात व्हायला हवे. दोन मुली असलेल्या कुटुंबांमध्ये केवळ आईचे समुपदेशन करून चालणार नाही, तर वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनाही मुलगा-मुलगी समानतेची जाणीव करून द्यावी. मुलगा होण्यासाठी महिलांवर टाकला जाणारा दबाव दूर करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे,...

