Thursday, October 29

Tag: #Mangalwedha

पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना
Maharashtra, Politics

पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला गती द्या; मार्च २०२७ पूर्वी पाणी सुरू करण्याचे आमदार आवताडे यांचे निर्देश पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज: मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहेत.योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कामातील अडथळ्यांचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यातील पंप हाऊस, मुख्य उर्ध्वगामी नलिका आणि वितरण व्यवस्थेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. दुसऱ्या टप्प्यातील कामांचे नियोजन करून मार्च २०२७ पूर्वी पाणी सोडण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत,अशा स...
दुष्काळग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी आठ दिवसांत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा रास्ता रोको आंदोलन
Maharashtra

दुष्काळग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी आठ दिवसांत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा रास्ता रोको आंदोलन

मंगळवेढ्यात ४५ गावांतील पशुपालक संकटात; १,३५० शेतकऱ्यांचा इशारा, आठ दिवसांत चारा द्या अन्यथा रास्ता रोको मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा व पाणी उपलब्ध करावे अन्यथा आठ दिवसांत रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा १,३५० दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला. मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या ४५ गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आठ दिवसांनंतर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांचे प्रतिनिधी तथा पुरवठा निरीक्षक नवनाथ चव्हाण यांच्याकडे बुधवार दि.१४ ऑक्टोबर लेखी निवेदन सादर केले.या निवेदनावर १,३५० शेतकऱ्यांच्या सह्या आ...
पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन
Maharashtra, Politics

पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर-मंगळवेढ्यात दुष्काळी संकट; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – भगीरथ भालके पंढरपूर-मंगळवेढा परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत, चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भगीरथ भालके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ : ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेचे नेते भगीरथ भालके यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्...