Wednesday, October 28

Tag: #MobileSecurity

मोबाईलमधील आपली माहिती खरंच सुरक्षित आहे का? फ्री ॲप्सच्या बदल्यात आपण नेमकं काय देतोय?
Cyber Crime

मोबाईलमधील आपली माहिती खरंच सुरक्षित आहे का? फ्री ॲप्सच्या बदल्यात आपण नेमकं काय देतोय?

मोबाईलमधील आपली माहिती खरंच सुरक्षित आहे का? फ्री ॲप्सच्या बदल्यात आपण नेमकं काय देतोय? आज मोबाईल हा फक्त फोन राहिलेला नाही. तो आपल्या आयुष्याचा डिजिटल आरसा बनला आहे. आपल्या कुटुंबीयांचे फोटो, बँक व्यवहार, आधारशी संबंधित माहिती, लोकेशन, संपर्क क्रमांक, आरोग्यविषयक माहिती, खरेदीची आवड, प्रवासाच्या सवयी, सोशल मीडिया पोस्ट सगळं काही या छोट्याशा उपकरणात साठलेलं आहे. पण एक साधा प्रश्न आपण स्वतःला किती वेळा विचारतो? माझ्या मोबाईलमध्ये असलेली ही माहिती नेमकी कोणाकडे जाते?” एखादे ॲप डाउनलोड करताना आपण Allow अलौं दाबतो. कॅमेरा, मायक्रोफोन,लोकेशन,कॉन्टॅक्ट्स, फोटो,स्टोरेज अशा अनेक परवानग्या सहज देतो.अनेकदा ॲपच्या अटी व शर्ती न वाचताच I Agree आय ॲग्री करतो. सुविधेच्या बदल्यात आपण आपल्या खासगी आयुष्याचा किती भाग डिजिटल जगाला देतो आहोत, याचा विचार मात्र क्वचितच होतो. फ्री ॲप खरंच फ्री अस...