डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवा तून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; एकनाथ शिंदेंकडून दिवाळी शिध्याचे ट्रक पाठविण्याची घोषणा
डोंबिवलीत डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा पाठविण्याची घोषणा; उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश भक्तीचा उत्सव,बळीराजासाठी मदतीचा संकल्प! डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श डोंबिवली | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना उत्सवातील भपका आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी हात पुढे करणारा डोंबिवलीतील नवरात्रोत्सव यंदा सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आहे. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन देवीच...

