गणरायाला निरोप देताना सुरक्षितता, शिस्त आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश; दुष्काळ निवारणासाठी शाश्वत उपायांचा आढावा घेत शासनस्तरावर पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात; महिला सुरक्षेचे कौतुक, दुष्काळ निवारणासाठी डॉ.नीलम गोऱ्हेंचा पुढाकार पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुरक्षितता, महिला सुरक्षा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. दुष्काळ निवारणासाठी जलसंधारण, जैवशेती आणि शाश्वत उपायांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा देत पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक केले. महिला व नागरिकांची सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मान यांना प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी दिला. याचवेळी दुष्काळ निवारण आणि जलसंधारणाच्या प्रश्नावरही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. केज, लातूर, अहमदपूर, तुळजापूर आदी भागांत जैवशेती व जलसंधारणा साठी काम करणाऱ्या संस्थांच्या अनुभवांचा अभ्...

