अपयशावर मात करत सरकोलीच्या तरुणाने उभारले मोठे उद्योग साम्राज्य;निखिल भोसले यांचा सकाळ कडून सन्मान
अपयशावर मात करत सरकोलीच्या तरुणाने उभारले मोठे उद्योग साम्राज्य;निखिल भोसले यांचा सकाळ कडून सन्मान पंढरपूरच्या सरकोली गावचे निखिल भोसले यांनी अपयशातून भरारी घेत उद्योगात यश मिळवले. 'सकाळ' माध्यम समूहाने त्यांचा विशेष गौरव केला असून जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातून आलेल्या निखिल भोसले यांनी उद्योजकता आणि समाजसेवेच्या बळावर उद्योग जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विशेष सरकारी वकील आणि खासदार ॲड.उज्ज्वल निकम आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ‘मराठा उद्योजकांची यशोगाथा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करून भोसले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ...

