घरातील महिला सक्षम असेल तर कुटुंबाची प्रगती लवकर होते – श्रीकांत यादव
घरातील महिला सक्षम असेल तर कुटुंबाची प्रगती लवकर होते – श्रीकांत यादव भाळवणीत गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा; विजेत्यांचा सन्मान भाळवणी येथे एलआयसी, प्रिती ऑनलाईन शॉप व तेज न्यूज आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. श्रीकांत यादव यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. भाळवणी | ज्ञानप्रवाह न्यूज : घराची भरभराट आणि प्रगती साधायची असेल तर घरातील महिला सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. महिला सक्षम असेल तर कुटुंबाची प्रगतीही लवकर होते,असे प्रतिपादन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील यशश्री क्लासेस येथे एलआयसी, प्रिती ऑनलाईन शॉप व तेज न्यूज यांच्यावतीने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्...

