Wednesday, October 28

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ६ ऑक्टोबरचा संप आणि मोर्चा मागे; मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर निदर्शनाबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी कर्मचारी संघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली.

या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर संघटनेने ६ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित केलेला लाक्षणिक संप आणि आझाद मैदानावरील मोर्चा मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव उपस्थित होते. शासन आणि अंगणवाडी कर्मचारी संघटने दरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे प्रस्तावित आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *