Wednesday, November 11

पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा गौरव! प्रा. डॉ.धनंजय वाघदरे यांना इंग्रजी विषयात पी.एच.डी. प्रदान

डॉ.धनंजय वाघदरे यांनी प्रीती शेनॉय,समीना अली,आभा दावेसर आणि मंजू कपूर यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील लिंगभाव, सत्ता आणि भाषा यांचा अभ्यास या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. समकालीन इंग्रजी साहित्याच्या माध्यमातून लिंगभाव, सामाजिक सत्तासंबंध आणि भाषेची भूमिका यांचा चिकित्सक अभ्यास त्यांनी या संशोधनातून केला आहे.

डॉ.वाघदरे यांच्या संशोधन कार्यासाठी कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार, जिल्हा बीड येथील प्रा.डॉ.रमेश अच्युतराव लांडगे यांनी संशोधन मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले.

डॉ.धनंजय वाघदरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव किशोर राजेनिंबाळकर, सहसचिव डॉ.शिवलिंग मेनकुदळे आणि मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या संशोधन कार्याचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनीही डॉ.वाघदरे यांचे अभिनंदन केले.इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ.समाधान माने,प्रा.डॉ. धनंजय साठे,प्रा.डॉ.सोमनाथ व्यवहारे आणि प्रा.कुबेर गायकवाड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

याशिवाय महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.संशोधन क्षेत्रा तील त्यांची ही कामगिरी इतर प्राध्यापक आणि संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

डॉ.धनंजय वाघदरे यांच्या पी.एच.डी.पदवीमुळे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि संशोधन परंपरेचा गौरव झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *