Thursday, October 29

गणेश विसर्जनासोबत निर्माल्य संकलन; पंढरपुरातील स्काऊट – गाईड विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका सौ.सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापक संतोष कवडे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात नदी, जलस्रोत तसेच परिसराचे प्रदूषण टाळणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

IMG_20260926_194724

या उपक्रमात शाळेतील स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासोबतच निर्माल्य संकलनाचे कार्यही केले. तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.

स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांना महेश भोसले सर आणि अशपाक मुजावर सर यांनी मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण हीच खरी गणेशभक्ती हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेची जाणीव अधिक दृढ झाली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *