Tuesday, October 27

Tag: ज्ञानप्रवाह न्यूज

धुळ्यात Coffee with Satyajeet उपक्रमातून Gen Z आणि तरुण- तरुणींशी साधला मनमोकळा संवाद
Maharashtra, Politics

धुळ्यात Coffee with Satyajeet उपक्रमातून Gen Z आणि तरुण- तरुणींशी साधला मनमोकळा संवाद

तरुणांच्या कल्पनांना कृतीची जोड देण्यासाठी Younnovation Centre ठरणार हक्काचं व्यासपीठ – आमदार सत्यजीत तांबे तरुणांच्या कल्पनांना मिळणार कृतीची जोड! पाच जिल्ह्यांत Younnovation Centre उभारणार; सत्यजीत तांबे यांची धुळ्यात घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘Coffee with Satyajeet’ उपक्रमातून धुळ्यात Gen Z आणि तरुणांशी संवाद. नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये Younnovation Centre च्या माध्यमातून शिक्षण, उद्योजकता, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. धुळे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑक्टोबर २०२६ : जळगावनंतर आज धुळे येथे Coffee with Satyajeet या संवाद मालिकेच्या माध्यमातून आमदार सत्यजीत तांबे यांनी विविध क्षेत्रांतील विद्यार्थी, Gen Z आणि तरुण-तरुणींशी मनमोकळा संवाद साधला.शिक्षण, रोजगार, व्यवसाय,शेती आणि तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर झालेल्या य...
जनतेसाठी राज्य शासनाकडून स्वतःच्या बसची दिवाळी भाडेवाढ रद्द;मात्र खाजगी बस आणि बुकिंग पोर्टल्स अजूनही मोकाट – सुराज्य अभियान
Maharashtra

जनतेसाठी राज्य शासनाकडून स्वतःच्या बसची दिवाळी भाडेवाढ रद्द;मात्र खाजगी बस आणि बुकिंग पोर्टल्स अजूनही मोकाट – सुराज्य अभियान

दिवाळीत एसटी बसची १५ टक्के प्रस्तावित भाडेवाढ रद्द,मात्र खासगी बस आणि ऑनलाइन बुकिंग पोर्टल्सवरील २०० ते ५०० टक्के भाडेवाढीवर कारवाईची सुराज्य अभियानाची मागणी. प्रवाशांसाठी डिजिटल भाडेमर्यादा, आरटीओ तक्रार QR कोड आणि नियमभंग करणाऱ्यांचे परवाने निलंबित करण्याची मागणी. दिवाळीत एसटीची भाडेवाढ रद्द, मग खासगी बसची लूट कधी थांबणार? सुराज्य अभियानाची परिवहनमंत्र्यांकडे कारवाईची मागणी जनतेसाठी राज्य शासनाकडून स्वतःच्या बसची दिवाळी भाडेवाढ रद्द;मात्र खाजगी बस आणि बुकिंग पोर्टल्स अजूनही मोकाट - सुराज्य अभियान मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७.१०. २०२६– दीपावलीनिमित्त MSRTC एमएसआरटीसी एस.टी.गाड्यांची १५% प्रस्तावित भाडेवाढ रद्द करण्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाचे सुराज्य अभियान ने स्वागत केले आहे.मात्र खाजगी बसचालक आणि ऑनलाईन पोर्टल Portals कडून होणाऱ्या २००% ते ५००% बेकायद...
गावकऱ्यांच्या मेहनतीतून सरकोलीचा कायापालट! आता बोटिंग,जलक्रीडा आणि पर्यटनातून रोजगाराची नवी आशा
Maharashtra

गावकऱ्यांच्या मेहनतीतून सरकोलीचा कायापालट! आता बोटिंग,जलक्रीडा आणि पर्यटनातून रोजगाराची नवी आशा

सरकोली येथे कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाच्या विकासाला नवी गती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कृष्णात पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मुख्य सचिव सुधाकर भोसले यांच्यासह मान्यवरांची भेट.बोटिंग,रस्ते,पूल, जलपर्यटन,पर्यटक निवास आणि रोजगारनिर्मितीसाठी निधी व शासकीय योजनांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन सरकोलीचे पर्यटनस्थळ महाराष्ट्रा च्या नकाशावर झळकणार? बोटिंग, जलपर्यटन अन् रोजगारनिर्मिती साठी शासनाकडे पाठपुरावा लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या हिरव्यागार पर्यटनस्थळाची मान्यवरांकडून पाहणी; रस्ते, पूल, पर्यटक निवास आणि जलक्रीडा सुविधांसाठी विकास आराखड्याला चालना देण्याची ग्वाही. सरकोली, ता.पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : गावाच्या विकासासाठी केवळ सरकारी निधीची वाट न पाहता लोकसहभाग,दानशूर व्यक्तींचे योगदान आणि ग्रामस्थांच्या अथक परिश्रमांतून एखादे गाव प...
137 कर्करोगाच्या औषधांवरील नफ्याच्या मर्यादेत सुधारणा सुधारित किमती 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील
Maharashtra, mumbai

137 कर्करोगाच्या औषधांवरील नफ्याच्या मर्यादेत सुधारणा सुधारित किमती 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील

137 कर्करोगाच्या औषधांवरील नफ्याच्या मर्यादेत सुधारणासुधारित किमती 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील PIB Mumbai,नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2026- रसायन आणि खते मंत्रालयातील औषध निर्माण विभागांतर्गत येणाऱ्या ‘राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने’ (NPPA) जनहितार्थ 137 ठरवून दिलेल्या बिगर-अनुसूचित कर्करोगविरोधी औषधांवर ‘व्यापार नफा मर्यादा सुसूत्रीकरण’ (ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन - TMR) लागू केले आहे. यामागचा मुख्य उद्देश, व्यापाऱ्यांचा अतिरिक्‍त नफा नियंत्रणात आणणे, कर्करोगावरील उपचार अधिक परवडणारे बनवणे आणि या औषधांची उपलब्धता सुलभ करणे हा आहे. सध्याच्या किमतींच्या रचनेनुसार, या निर्णयामुळे संबंधित कर्करोगविरोधी औषधांचे कमाल किरकोळ मूल्य (MRP) 70 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.हा निर्णय NPPA ने 2019 मध्ये राबवलेल्या प्रायोगिक TMR उपक्रमाच्या यशावर आधारित आहे. त्या उपक्रमांतर्गत...
डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवा तून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; एकनाथ शिंदेंकडून दिवाळी शिध्याचे ट्रक पाठविण्याची घोषणा
Maharashtra, mumbai

डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवा तून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; एकनाथ शिंदेंकडून दिवाळी शिध्याचे ट्रक पाठविण्याची घोषणा

डोंबिवलीत डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा पाठविण्याची घोषणा; उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश भक्तीचा उत्सव,बळीराजासाठी मदतीचा संकल्प! डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श डोंबिवली | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना उत्सवातील भपका आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी हात पुढे करणारा डोंबिवलीतील नवरात्रोत्सव यंदा सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आहे. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन देवीच...
पंढरपुरात ललित पंचमीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला अलंकारांचा साज; रुक्मिणी मातेला वनदेवी माता पोशाख
Maharashtra

पंढरपुरात ललित पंचमीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला अलंकारांचा साज; रुक्मिणी मातेला वनदेवी माता पोशाख

पंढरपूरमध्ये नवरात्र महोत्सवाच्या ललित पंचमीला श्री विठ्ठल, रुक्मिणी माता आणि परिवार देवतांना पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेला वनदेवी माता पोशाख;मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली माहिती. ललित पंचमीला विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मनमोहक रूप! रुक्मिणी मातेला वनदेवी पोशाख, सोन्या-मोत्यांच्या अलंकारांनी सजले देव पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑक्टोबर : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेपासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात ललित पंचमीच्या पाचव्या माळेनिमित्त श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना पारंपरिक पोशाखासह विविध अलंकार परिधान करण्यात आले. यावेळी रुक्मिणी मातेला विशेष वनदेवी माता पोशाख परिधान करण्यात आला अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यां...
अवैध गर्भलिंग निदान व बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा : डॉ.नीलम गोऱ्हे
Maharashtra

अवैध गर्भलिंग निदान व बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा : डॉ.नीलम गोऱ्हे

सोलापूरमध्ये पीसीपीएनडीटी PCPNDT व एमटीपी MTP आढावा बैठक; दलालांची ओळख पटवण्यासाठी आमदार निधीतून सीसीटीव्ही देण्याची तयारी सोलापूरमध्ये अवैध गर्भलिंग निदान, बोगस डॉक्टर आणि दलालांविरुद्ध धडक मोहीम राबवण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश. PCPNDT आणि MTP कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सीसीटीव्ही, पोलीस-आरोग्य विभाग समन्वय आणि कठोर कारवाईवर भर वैध गर्भलिंग निदान आणि बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश,सीसी टीव्हीसाठी आमदार निधी देण्याची तयारी पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा; संशयित दलालांवर लक्ष, पोलीस-आरोग्य विभागाच्या संयुक्त कारवाईवर भर सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ ऑक्टोबर २०२६ : अवैध गर्भलिंग निदान करणारे, अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्या दलालांविरुद्ध आरोग्य व पोलीस विभागाने समन्वयाने धडक मोहीम...
भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; अक्कलकोट, तुळजापूर, मार्डी आणि पंढरपूर येथील देवस्थानांचे दर्शन घेण्याची संधी
Maharashtra

भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; अक्कलकोट, तुळजापूर, मार्डी आणि पंढरपूर येथील देवस्थानांचे दर्शन घेण्याची संधी

नवरात्रोत्सवानिमित्त सरकोलीतील महिलांसाठी स्वर्गीय लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीने मोफत देवदर्शन यात्रा आयोजित.भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवात सरकोलीतील महिलांना मोफत देवदर्शनाची पर्वणी! भगीरथदादा भालके यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक यात्रेचे आयोजन सरकोलीतील महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रा; नवरात्रोत्सवात भक्तीचा जागर Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. सरकोली, ता.पंढरपूर ज्ञानप्रवाह न्यूज : नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेता यावे आणि त्यांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने मौजे सरकोली येथील महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.स्वर्गीय लोकनेते आमदार भारत नाना भालके ...
पंढरपूरमध्ये पाणीटंचाईचे सावट! शुक्रवारपासून एक दिवसाआड पाणी;तुमचा भाग कोणत्या दिवशी?
Maharashtra

पंढरपूरमध्ये पाणीटंचाईचे सावट! शुक्रवारपासून एक दिवसाआड पाणी;तुमचा भाग कोणत्या दिवशी?

पंढरपूर शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर २०२६ पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे.रेल्वे रुळा खालील आणि रेल्वे रुळावरील भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर. पाणी जपून वापरण्याचे पंढरपूर नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन. पंढरपूरकरांनो,पाणी जपून वापरा १६ ऑक्टोबरपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचा निर्णय पंढरपूरमध्ये पाणीबचतीची कसोटी! आता एक दिवसाआड नळाला पाणी; नागरिकांनीही जबाबदारी ओळखण्याची वेळ पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑक्टोबर :पाणी हे केवळ नैसर्गिक साधन नाही तर प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जगण्याचा आधार आहे. मात्र पावसाची कमतरता आणि मर्यादित पाणीसाठा यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याची वेळ आता पंढरपूर शहरावर आली आहे. पंढरपूर नगरपरिषदेने जाहीर निवेदनाद्वारे शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ पासून शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा न...
दुष्काळग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी आठ दिवसांत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा रास्ता रोको आंदोलन
Maharashtra

दुष्काळग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी आठ दिवसांत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा रास्ता रोको आंदोलन

मंगळवेढ्यात ४५ गावांतील पशुपालक संकटात; १,३५० शेतकऱ्यांचा इशारा, आठ दिवसांत चारा द्या अन्यथा रास्ता रोको मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा व पाणी उपलब्ध करावे अन्यथा आठ दिवसांत रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा १,३५० दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला. मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या ४५ गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आठ दिवसांनंतर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांचे प्रतिनिधी तथा पुरवठा निरीक्षक नवनाथ चव्हाण यांच्याकडे बुधवार दि.१४ ऑक्टोबर लेखी निवेदन सादर केले.या निवेदनावर १,३५० शेतकऱ्यांच्या सह्या आ...