
तरुणांच्या कल्पनांना कृतीची जोड देण्यासाठी Younnovation Centre ठरणार हक्काचं व्यासपीठ – आमदार सत्यजीत तांबे
तरुणांच्या कल्पनांना मिळणार कृतीची जोड! पाच जिल्ह्यांत Younnovation Centre उभारणार; सत्यजीत तांबे यांची धुळ्यात घोषणा
आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘Coffee with Satyajeet’ उपक्रमातून धुळ्यात Gen Z आणि तरुणांशी संवाद. नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये Younnovation Centre च्या माध्यमातून शिक्षण, उद्योजकता, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
धुळे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑक्टोबर २०२६ : जळगावनंतर आज धुळे येथे Coffee with Satyajeet या संवाद मालिकेच्या माध्यमातून आमदार सत्यजीत तांबे यांनी विविध क्षेत्रांतील विद्यार्थी, Gen Z आणि तरुण-तरुणींशी मनमोकळा संवाद साधला.शिक्षण, रोजगार, व्यवसाय,शेती आणि तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर झालेल्या या चर्चेत तरुणांनी आपल्या कल्पना,प्रश्न आणि अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या.
धुळ्यातील या संवादात विविध क्षेत्रांत शिक्षण घेणारे, नोकरी- व्यवसाय करणारे आणि स्वतःच्या कल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची इच्छा असलेले तरुण सहभागी झाले होते. त्यांच्या आत्मविश्वासातून आणि काहीतरी नवीन घडवण्याच्या जिद्दीतून तरुणाईची क्षमता स्पष्टपणे दिसून आली.शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंत, ग्रामीण प्रश्नांपासून जागतिक संधीं पर्यंत अनेक विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

तरुणांकडे कल्पना आहेत,क्षमता आहे आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्दही आहे.त्यांच्या प्रश्नांवर काम करण्याचा आणि प्रत्येक क्षेत्रात आवडीने काम करणाऱ्या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा माझा प्रयत्न असेल,अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी मांडली.
तरुणांच्या कल्पनांना योग्य दिशा, आवश्यक मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते स्वतःच्या भविष्याची उभारणी करण्यासोबतच समाजाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हा या संवादाचा महत्त्वाचा उद्देश होता.
याच उद्देशाने नाशिक,धुळे,नंदुरबार अहिल्यानगर आणि जळगाव या पाच जिल्ह्यांत Younnovation Centre उभारण्यात येत आहेत. Education, Entrepreneurship, Essentials for Livelihood आणि Employment या चार प्रमुख घटकांवर ही केंद्रे काम करणार आहेत.शिक्षण, उद्योजकता, उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी यांची सांगड घालत तरुणांना पुढे जाण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे,हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
Coffee with Satyajeet च्या माध्यमातून तरुणांचे प्रश्न समजून घेणे, त्यांना प्रत्यक्ष संधींशी जोडणे, या दिशेने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरत आहे.
