Thursday, October 29

Tag: #क्राईमबातमी

आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त
Crime, Maharashtra, Police

आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.२६ ऑक्टोबर २०२६ : घरातील आजारी आईची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवलेल्या महिलेने घरातील लपवलेल्या चावीचा वापर करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार पंढरपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास करत पंढरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ५.५० तोळे वजनाचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.वनिता समाधान कांबळे रा. टाकळी रोड पंढरपूर असे या प्रकरणातील आरोपी महिलेचे नाव पोलिसांनी दिले आहे. जुन्या कराड नाक्यावरील घरातून दागिने चोरीला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन ज्ञानेश्वर ताटे रा.जुना कराड नाका पंढरपूर यांनी घरातील कपाटात सोन्याचे दागिने ठेवले होते.कपाटाची चावीही घरात ठेवण्यात आली होती. २९ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने कपाटातील ५.५० तोळे वज...