Wednesday, October 28

Crime

आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त
Crime, Maharashtra, Police

आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.२६ ऑक्टोबर २०२६ : घरातील आजारी आईची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवलेल्या महिलेने घरातील लपवलेल्या चावीचा वापर करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार पंढरपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास करत पंढरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ५.५० तोळे वजनाचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.वनिता समाधान कांबळे रा. टाकळी रोड पंढरपूर असे या प्रकरणातील आरोपी महिलेचे नाव पोलिसांनी दिले आहे. जुन्या कराड नाक्यावरील घरातून दागिने चोरीला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन ज्ञानेश्वर ताटे रा.जुना कराड नाका पंढरपूर यांनी घरातील कपाटात सोन्याचे दागिने ठेवले होते.कपाटाची चावीही घरात ठेवण्यात आली होती. २९ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने कपाटातील ५.५० तोळे वज...
डोंगराळे प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे स्वागत; उच्च व सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीही प्राधान्याने व्हावी : डॉ. नीलम गोऱ्हे
Crime, Maharashtra, mumbai

डोंगराळे प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे स्वागत; उच्च व सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीही प्राधान्याने व्हावी : डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिक ग्रामीण पोलीस व सरकारी वकिलांच्या कामगिरीचे कौतुक; पुढील न्यायालयीन प्रक्रिया जलद करण्याची मागणी डोंगराळे बालिका हत्या प्रकरण: विजय खैरनारला फाशी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची उच्च व सर्वोच्च न्यायालयात जलद सुनावणीची मागणी पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ ऑक्टोबर २०२६ : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी विजय खैरनार याला मालेगाव न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या व माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले.अशा गंभीर प्रकरणां तील उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीही प्राधान्याने व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर २०२५ रोजी साडेचार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली ह...
करमाळ्यात मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; मोका कायद्यान्वयेही कारवाई
Crime, Police

करमाळ्यात मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; मोका कायद्यान्वयेही कारवाई

करमाळ्यात मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; मोका कायद्यान्वयेही कारवाई मुलीच्या विवाहाचे आमिष आणि दैवी शक्तीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप; पुण्यातील तक्रारदाराची ६ लाखोंचा ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा दावा करमाळा | ज्ञानप्रवाह न्यूज: मनोहर ऊर्फ मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा...
धोंडू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दत्तकला चे अध्यक्ष रामदास झोळ टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
Crime, Maharashtra, Police

धोंडू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दत्तकला चे अध्यक्ष रामदास झोळ टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

धोंडू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दत्तकला चे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज : करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भोंदू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दौंड येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का - MCOCA अंतर्गत कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि काळा जादू प्रतिबंधक गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व काळा जादू प्रतिबंध व निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सुरू असताना, मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले आणि त्याचा सहकारी विशाल...
नवरात्रौत्सवासाठी पंढरपूर पोलीस अलर्ट! मंदिर परिसरात मॉकड्रिल; शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम
Maharashtra, Police

नवरात्रौत्सवासाठी पंढरपूर पोलीस अलर्ट! मंदिर परिसरात मॉकड्रिल; शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचे मॉकड्रिल; आपत्कालीन परिस्थितीसाठी शीघ्रकृती दल सज्ज पंढरपुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रिल; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात शीघ्रकृती, दंगा नियंत्रण व बॉम्बशोधक पथकाचा सहभाग. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ७ ऑक्टोबर २०२६ : आगामी शारदीय नवरात्रौत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पंढरपूर शहर पोलीस दल सतर्क झाले आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा अनुचित प्रसंगी पोलीस दल घटनास्थळी किती वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचते, याची चाचपणी करण्यासाठी बुधवारी (दि. ७) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मॉकड्रिल घेण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून या मॉकड्रिलच्या माध...
मुळेगाव तांड्यावर अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा 5 लाख 41 हजारांचा मुद्देमाल नष्ट,4 सराईतांवर गुन्हे
Crime, Police

मुळेगाव तांड्यावर अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा 5 लाख 41 हजारांचा मुद्देमाल नष्ट,4 सराईतांवर गुन्हे

मुळेगाव तांड्यावर पोलिसांची मोठी कारवाई! जेसीबीच्या सहाय्याने अवैध हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त; 5.41 लाखांचा मुद्देमाल नष्ट, चार जणांवर गुन्हे दक्षिण सोलापूरच्या मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचा छापा; 5.41 लाखांचा मुद्देमाल नष्ट, चार सराईतांवर गुन्हे दाखल. सोलापूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ ऑक्टोबर २०२६ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याला आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायाविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणी छापा टाकला. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. स...
शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध
Crime, Police

शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध

शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध सोलापूर जिल्हा परिसरातील सराईत गुन्हेगार शरद विठ्ठल कोळी याच्यावर MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे.याच कारवाईचा भाग म्हणून शरद विठ्ठल कोळी याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले,औषधविक्रेते, धोकादायक व्यक्ती आणि व्हाइट कॉलर गुन्हेगार यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठीचा कायदा अर्थात MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.त्याला ...
मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime, Maharashtra, Police

मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल तक्रार केली तर अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करू असा धमकीचा आरोप; मंगळवेढ्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून आशा सुपरवायझर महिलेला मारहाण, शिवीगाळ व धमकी; गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून नेल्याचा आरोप. १२ जणांविरुद्ध BNS कलमांनुसार गुन्हा दाखल. मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : प्लॉटच्या वादातून एका महिलेला बोलावून शिवीगाळ, मारहाण, धमकी तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेल्याचा प्रकार मंगळवेढा शहरात घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता राजू काळुंगे वय ४०, व्यवसाय आशा सुपरवायझर, रा.कचरेवाडी,ता.मंगळवेढा यांना दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमार...
अक्कलकोटमध्ये ऊसाच्या शेतात गांजाची शेती! २४० झाडे जप्त, किंमत तब्बल १ कोटी ५ लाख
Crime, Police

अक्कलकोटमध्ये ऊसाच्या शेतात गांजाची शेती! २४० झाडे जप्त, किंमत तब्बल १ कोटी ५ लाख

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई; आळगी येथील ऊसाच्या शेतातून २११ किलो गांजा जप्त,६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा अक्कलकोटच्या आळगी येथे ऊसाच्या शेतातून २११ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त. २४० झाडांची लागवड उघड; मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये. अक्कलकोट|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ सप्टेंबर २०२६ : सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची २४० झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई २८ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली. गोपनीय माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार...
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चेन स्नॅचिंग सह जनावर चोरीचे गुन्हे उघड,मुद्देमाल जप्त
Crime, Maharashtra, Police

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चेन स्नॅचिंग सह जनावर चोरीचे गुन्हे उघड,मुद्देमाल जप्त

अकलूज | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० सप्टेंबर २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चैन स्नॅचिंग आणि जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे फिर्यादीची आई व आजी झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी व सोन्याचे कर्णफुले चोरून नेली होती. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ३० मे २०२६ रोजी रात्री ११.३० ते ३१ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान गणेशनगर, ता. माळशिरस येथील घरासमोरून चार शेळ्या आणि पाच बोकडे चो...