गणरायाच्या चरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांचे साकडे; महिला नेतृत्वाला अधिक बळ मिळावेसह सामाजिक सलोख्याचा संदेश
१९७४ पासूनची गणेशभक्ती! बसंत-पार्वती पासून सिल्व्हर रॉक्स पर्यंत डॉ.नीलम गोऱ्हेंची ५ दशकांची परंपरा पाच दशकांची गणेशभक्ती आणि महिला नेतृत्वाचा संकल्प; सिल्व्हर रॉक्स मध्ये गणरायाच्या चरणी डॉ. नीलम गोऱ्हेंचे साकडे पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही तर कुटुंबाला एकत्र आणणारी, सामाजिक सलोखा वाढविणारी आणि नव्या पिढीला संस्कारांची जोड देणारी परंपरा आहे.याच भावनेतून शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी श्री गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी कुटुंबीय, नातेवाईक, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरळीपासून पुण्यापर्यंत... पाच दशकांची परंपरा डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कुटुंबातील ...

