चिंचोली भोसेच्या लेखकाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा; गद्दारांची औलाद पुस्तका मुळे अमर कांबळे यांची साहित्यविश्वात वेगळी ओळख
चिंचोली भोसे येथील पत्रकार व लेखक अमर कांबळे यांच्या ‘गद्दारांची औलाद’ या सत्यघटनेवर आधारित विद्रोही कादंबरीची अमेरिका, लंडन, दुबई आणि आशियातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या साहित्यिक प्रवासाची सर्वत्र चर्चा. खेडेगावातून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप! अमर कांबळे यांच्या गद्दारांची औलाद पुस्तकाची बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद चिंचोली भोसे ता.पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : ग्रामीण भागातून साहित्यनिर्मिती करत आपल्या लेखणीच्या जोरावर व्यापक वाचक वर्गापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात.मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्य, जिद्द , इच्छाशक्तीची आवश्यकता असते.चिंचोली भोसे येथील पत्रकार व लेखक अमर कांबळे यांनी आपल्या साहित्यिक प्रवासातून हेच दाखवून दिले आहे. त्यांच्या गद्दारांची औलाद या पुस्तकाची अमेरिका, लंड...

