
चिंचोली भोसे येथील पत्रकार व लेखक अमर कांबळे यांच्या ‘गद्दारांची औलाद’ या सत्यघटनेवर आधारित विद्रोही कादंबरीची अमेरिका, लंडन, दुबई आणि आशियातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या साहित्यिक प्रवासाची सर्वत्र चर्चा.
खेडेगावातून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप! अमर कांबळे यांच्या गद्दारांची औलाद पुस्तकाची बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
चिंचोली भोसे ता.पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज :ग्रामीण भागातून साहित्यनिर्मिती करत आपल्या लेखणीच्या जोरावर व्यापक वाचक वर्गापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात.मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्य, जिद्द , इच्छाशक्तीची आवश्यकता असते.चिंचोली भोसे येथील पत्रकार व लेखक अमर कांबळे यांनी आपल्या साहित्यिक प्रवासातून हेच दाखवून दिले आहे. त्यांच्या गद्दारांची औलाद या पुस्तकाची अमेरिका, लंडन, दुबई आणि आशियातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या नोंदीमुळे त्यांच्या साहित्यिक प्रवासाची चर्चा सुरू झाली आहे.

चार पुस्तकांचा साहित्यिक प्रवास
अमर कांबळे हे मूळचे चिंचोली भोसे ता.पंढरपूर येथील रहिवासी असून पत्रकारितेसोबतच लेखन क्षेत्रातही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत त्यांनी चार पुस्तके लिहिल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक प्रश्न,अन्यायाविरोधा तील भूमिका आणि मानवी भावविश्व यांसारख्या विषयांना स्थान मिळाले आहे.
त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढा या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर आईच्या रक्ताची जाणीव या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भव्य स्वरूपात झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आईच्या रक्ताची जाणीव या पुस्तकाला राज्यभरातील वाचकां कडून प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.वाचकांची आवड आणि वाढती मागणी लक्षात घेऊन कांबळे यांनी पुढील लेखना साठी वेगळा विषय निवडण्याचा निर्णय घेतला.
गद्दारांची औलाद : सत्यघटनेवर आधारित विद्रोही कादंबरी
गद्दारांची औलाद हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित विद्रोही कादंबरी असल्याचे लेखकाकडून सांगण्यात आले आहे. पुस्तकाच्या नावामुळे आणि विषयामुळे या साहित्यकृती विषयी उत्सुकता निर्माण झाल्याचे सांगत प्रकाशनापूर्वीच या पुस्तकाची चर्चा अमेरिका, लंडन, दुबई आणि आशियातील विविध ठिकाणी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.पुस्तकाबद्दल वाढती उत्सुकता व मागणी असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही गौरव
अमर कांबळे यांना २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. त्यांच्या लेखनाची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या पुरस्कारा संबंधी अधिकृत आयोजकांची माहिती आणि प्रमाणपत्राच्या आधारे तपशील निश्चित करणे आवश्यक आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान
गद्दारांची औलाद पुस्तकाच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधील नोंदीच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अध्यक्ष अविनाश सकुंडे यांच्यासह देशातील आणि राज्यातील विविध मान्यवर, सिने अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते अमर कांबळे यांना सन्मानित करण्यात आले असून यावेळी त्यांना नोंदपत्र, सन्मान चिन्ह आणि रेकॉर्डशी संबंधित प्रमाणपत्र प्रदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील लेखकांच्या जिद्दीची चर्चा
ग्रामीण भागातील लेखकांना अनेकदा प्रकाशन,वितरण,प्रसिद्धी व वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो.अशा परिस्थितीत पत्रकारितेसोबत लेखनाची वाट निवडून चार पुस्तके लिहिण्याचा प्रवास अमर कांबळे यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे.
गद्दारांची औलाद या पुस्तकाच्या नोंदीसंदर्भातील माहितीमुळे त्यांच्या नावाची चर्चा होत असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
