Thursday, October 29

Tag: #दुष्काळमदत

शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली केल्यास फौजदारी गुन्हा; मुख्यमंत्री फडणवीसांचा मायक्रोफायनान्स कंपन्यांना इशारा
Maharashtra, mumbai

शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली केल्यास फौजदारी गुन्हा; मुख्यमंत्री फडणवीसांचा मायक्रोफायनान्स कंपन्यांना इशारा

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दमदाटी करून कर्जवसुली केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्जवसुलीच्या त्रासापासून संरक्षण देण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजारांची अग्रीम मदत राज्यातील दुष्काळग्रस्त सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने निधीसह मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी सर्व पात्र श...