Thursday, October 29

Tag: #मंगळवेढा

भीमा नदीवरील ४ बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर होणार; सर्वेक्षणासाठी ७२ लाख मंजूर, आ. समाधान आवताडे यांची माहिती
Maharashtra, Politics

भीमा नदीवरील ४ बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर होणार; सर्वेक्षणासाठी ७२ लाख मंजूर, आ. समाधान आवताडे यांची माहिती

उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भीमा नदीवर बॅरेजचा मार्ग मोकळा; चार बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी ७२ लाख मंजूर पावसाळ्यात पूर,उन्हाळ्यात पाण्याची वणवण,भीमा नदीवरील चार बंधाऱ्यांसाठी ७२ लाख मंजूर; शेतकऱ्यांना काय फायदा होणार ? पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भीमा नदीवरील मुंढेवाडी, बठाण, माचणूर आणि अरळी येथील को.प. बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वेक्षण व अन्वेषणाकरिता ७२ लाख रुपये मंजूर. आमदार समाधान आवताडे यांचा पुढाकार पंढरपूर-मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी भीमा नदी उन्हाळ्यात कोरडी पडते आणि पाण्याच्या प्रतीक्षेत नदीकाठच्या शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी भीमा नदी वरील को.प.बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघा तील च...
Maharashtra

मंगळवेढ्यात ४,७७७ रेशन कार्डांचा मुद्दा पेटला! प्रणिती शिंदे मैदानात; धान्यपुरवठा सुरू करण्याची मागणी

मंगळवेढा तालुक्यात मिशन सुधार अंतर्गत बंद केलेली ४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करून नियमित धान्य पुरवठा सुरू करण्याच्या मागणी साठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. ४,७७७ रेशन कार्डे बंद; गरीब कुटुंबांच्या ताटातील धान्याचा प्रश्न ऐरणीवर! मंगळवेढ्यात प्रणिती शिंदे यांचे धरणे आंदोलन मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.२६ ऑक्टोबर २०२६ :दुष्काळाचे संकट, पिण्याच्या पाण्याची चिंता आणि त्यात रेशनच्या धान्यापासून वंचित राहण्याची वेळ! मंगळवेढा तालुक्यात मिशन सुधार योजनेंतर्गत बंद करण्यात आलेली सुमारे ४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करून लाभार्थ्यांना नियमित धान्य पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्यावतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात ...
भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल आता शून्य होणार! जुनोनीत १५५ केव्हीए सौर प्रकल्प सुरू; आ.समाधान आवताडे यांचा पुढाकार
Maharashtra

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल आता शून्य होणार! जुनोनीत १५५ केव्हीए सौर प्रकल्प सुरू; आ.समाधान आवताडे यांचा पुढाकार

मंगळवेढा तालुक्यातील भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जुनोनी जलशुद्धीकरण केंद्रावर १५५ केव्हीए सौर प्रकल्प कार्यान्वित झाला. दररोज सुमारे ४०० युनिट वीज निर्मितीमुळे वीज बिल शून्य होण्याची अपेक्षा-आमदार समाधान आवताडे यांची माहिती वीज बिलाच्या कचाट्यातून भोसे पाणीपुरवठा योजना सुटणार! जुनोनीत सौर प्रकल्प सुरू; ३९ गावांना दिलासा मिळण्याची आशा भोसेसह ३९ गावांसाठी मोठी बातमी! पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलावर सौरऊर्जेचा उतारा; जुनोनीत प्रकल्प सुरू मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क: वीज बिल थकल्याने पाणीपुरवठा योजनेवर निर्माण होणारा आर्थिक ताण आणि त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होण्याची समस्या आता कमी होण्याची अपेक्षा आहे. मंगळवेढा तालुक्यातील भोसे व इतर ३९ गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जुनोनी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर १५५ केव्हीए क्षमतेचा सौरऊर्जा ...
पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना
Maharashtra, Politics

पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला गती द्या; मार्च २०२७ पूर्वी पाणी सुरू करण्याचे आमदार आवताडे यांचे निर्देश पहिल्या टप्प्यातील १११ कोटी, दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी ४३ लाखांच्या कामांचा आढावा; तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही वेग देण्याच्या सूचना मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज: मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहेत.योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कामातील अडथळ्यांचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यातील पंप हाऊस, मुख्य उर्ध्वगामी नलिका आणि वितरण व्यवस्थेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. दुसऱ्या टप्प्यातील कामांचे नियोजन करून मार्च २०२७ पूर्वी पाणी सोडण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत,अशा स...
दुष्काळग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी आठ दिवसांत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा रास्ता रोको आंदोलन
Maharashtra

दुष्काळग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी आठ दिवसांत चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा रास्ता रोको आंदोलन

मंगळवेढ्यात ४५ गावांतील पशुपालक संकटात; १,३५० शेतकऱ्यांचा इशारा, आठ दिवसांत चारा द्या अन्यथा रास्ता रोको मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त ४५ गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा व पाणी उपलब्ध करावे अन्यथा आठ दिवसांत रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा १,३५० दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला. मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या ४५ गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आठ दिवसांनंतर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांचे प्रतिनिधी तथा पुरवठा निरीक्षक नवनाथ चव्हाण यांच्याकडे बुधवार दि.१४ ऑक्टोबर लेखी निवेदन सादर केले.या निवेदनावर १,३५० शेतकऱ्यांच्या सह्या आ...
मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; आमदार समाधान आवताडे यांची मागणी
Maharashtra

मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; आमदार समाधान आवताडे यांची मागणी

मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; आमदार समाधान आवताडे यांची मागणी केंद्रीय पथकप्रमुख डॉ.के. पोनुसामी यांच्याकडे १७ मागण्यांचे निवेदन; फळबागांसाठी हेक्टरी १.२५ लाखांचे विशेष पॅकेज आणि दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाची मागणी मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई, फळबागांसाठी हेक्टरी १.२५ लाखांचे पॅकेज आणि दिवाळी पूर्वी अनुदान द्यावे, अशी आमदार समाधान आवताडे यांची केंद्रीय पथकाकडे १७ मागण्यांची निवेदनाद्वारे मागणी. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, फळबागांसाठी हेक्टरी किमान १ लाख २५ हजार रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे आणि दुष्काळ अनुदानाचे वाटप दिवाळीपूर्वी करावे, अशा १७ महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन आमदार समाधान आवताडे यांन...
पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन
Maharashtra, Politics

पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर-मंगळवेढ्यात दुष्काळी संकट; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – भगीरथ भालके पंढरपूर-मंगळवेढा परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत, चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भगीरथ भालके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ : ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेचे नेते भगीरथ भालके यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्...
मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime, Maharashtra, Police

मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल तक्रार केली तर अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करू असा धमकीचा आरोप; मंगळवेढ्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून आशा सुपरवायझर महिलेला मारहाण, शिवीगाळ व धमकी; गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून नेल्याचा आरोप. १२ जणांविरुद्ध BNS कलमांनुसार गुन्हा दाखल. मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : प्लॉटच्या वादातून एका महिलेला बोलावून शिवीगाळ, मारहाण, धमकी तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेल्याचा प्रकार मंगळवेढा शहरात घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता राजू काळुंगे वय ४०, व्यवसाय आशा सुपरवायझर, रा.कचरेवाडी,ता.मंगळवेढा यांना दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमार...
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला सलाम; मंगळवेढ्यात आदर्श शिक्षकांचा गौरव,आमदार समाधान आवताडे यांची उपस्थिती
Maharashtra

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला सलाम; मंगळवेढ्यात आदर्श शिक्षकांचा गौरव,आमदार समाधान आवताडे यांची उपस्थिती

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला सलाम; मंगळवेढ्यात आदर्श शिक्षकांचा गौरव,आमदार समाधान आवताडे यांची उपस्थिती शिक्षकांच्या मेहनतीचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; लक्ष्मी दहिवडीत रंगला प्रेरणादायी सोहळा Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा झाला.आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आणि उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक हा प्रेरणादायी उपक्रम आहे. लक्ष्मी दहिवडी येथील कृष्णाई मल्टिपर्पज हॉलमध्ये मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद...