Thursday, October 29

Tag: #सामाजिकबांधिलकी

दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला द्या साथ,अवघ्या ५० रुपयांत खरेदी करा आकर्षक मेणपणत्या; स्वावलंबनाच्या दिशेने उजळवा आशेचा दीप
Maharashtra

दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला द्या साथ,अवघ्या ५० रुपयांत खरेदी करा आकर्षक मेणपणत्या; स्वावलंबनाच्या दिशेने उजळवा आशेचा दीप

दहा मेणपणत्या फक्त ५० रुपयांत! पंढरपूरच्या दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला साथ देण्याची संधी पंढरपूरच्या शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी आकर्षक मेणपणत्या व मेणबत्त्या तयार केल्या आहेत. १० मेणपणत्यांचे पाकीट फक्त ५० रुपयांत उपलब्ध असून, खरेदीतून विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाला बळ देण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष मुन्नागिर गोसावी यांनी केले आहे. दिव्यांगत्वावर मात करत कलेतून स्वावलंबनाची भरारी! पंढरपूर | dnyanpravahnews : अंधारावर मात करून प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिव्यांची निर्मिती आता दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कुशल हातांतून होत आहे. पंढरपूर येथील लायन्स क्लब पंढरपूर यांच्या अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला कौशल्याची जोड देत विविध प्रकारच्या आकर्षक मेणपणत्या आणि मेणबत्त्य...
पंढरपुरात एसबीआयचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; लोकमान्य विद्यालयातील २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
Maharashtra

पंढरपुरात एसबीआयचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; लोकमान्य विद्यालयातील २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

पंढरपूरमध्ये SBI च्या CSR उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालयातील २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम. शाळेचा प्रवास होणार सोपा! पंढरपुरात SBI कडून २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींची भेट पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज:मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासा तील अडचणी दूर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI च्या पंढरपूर शाखेने सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबविला. बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालयातील २७ गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शाळेत येण्या- जाण्याचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. शिक्षणासाठी बँकेचा सामाजिक पुढाकार स्टेट बँक ऑफ इंडिया विविध सामाजिक आणि ...
डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवा तून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; एकनाथ शिंदेंकडून दिवाळी शिध्याचे ट्रक पाठविण्याची घोषणा
Maharashtra, mumbai

डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवा तून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; एकनाथ शिंदेंकडून दिवाळी शिध्याचे ट्रक पाठविण्याची घोषणा

डोंबिवलीत डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा पाठविण्याची घोषणा; उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश भक्तीचा उत्सव,बळीराजासाठी मदतीचा संकल्प! डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श डोंबिवली | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना उत्सवातील भपका आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी हात पुढे करणारा डोंबिवलीतील नवरात्रोत्सव यंदा सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आहे. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन देवीच...
रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आंबवड्यात ५७ जणांनी दिले रक्त,रक्तदात्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण
Maharashtra

रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आंबवड्यात ५७ जणांनी दिले रक्त,रक्तदात्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण

रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; आंबवडेत ५७ रक्तदात्यांचे योगदान स्वराज्यभूमी प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना ५ लाखांचे अपघाती विमा संरक्षण आंबवडे,ता.भोर | ज्ञानप्रवाह न्यूज , दि.१९ सप्टेंबर २०२६ : गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वराज्यभूमी प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ आंबवडे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दि.१८ सप्टेंबर रोजी कान्होजी जेधे सभागृह, आंबवडे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. हे रक्तदान शिबिर भोर-वेल्ह्याचे माजी आमदार तसेच रायरेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे जनक स्व.मा. संपतराव रामचंद्र जेधे आणि कै. सुमन सं...