Wednesday, October 28

Tag: #स्त्रीवादीसाहित्यसंमेलन

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!
Maharashtra, mumbai

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!

पुण्यातील स्त्रीवादी साहित्य संमेलनात मी का लिहिते? परिसंवादातून सात लेखिकांनी मांडल्या लेखनप्रेरणा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांचे लेखन सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरण्याची गरज व्यक्त केली. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क,दि. २४ ऑक्टोबर : अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, ग्रामीण आणि बहुजन स्त्रियांच्या जगण्याला शब्द देण्यासाठी, स्त्रीवादाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी आणि मूक प्राण्यांच्या वेदना समाजासमोर आणण्यासाठी आम्ही लिहितो, अशा विविध लेखनप्रेरणांचा उलगडा पुण्यातील स्त्रीवादी साहित्य संमेलनात झाला. ‘मी का लिहिते? या विशेष परिसंवादात सात लेखिकांनी आपल्या लेखन प्रवासातील अनुभव मांडत साहित्य हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून सामाजिक वास्तवाची नोंद घेणारी आणि परिवर्तनाची दिशा दाखवणारी कृती असल्याचे अधोरेखित केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर ...
स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्यासाठी विविध पिढ्यांतील लेखिकांचा संवाद आवश्यक : आ. डॉ.नीलम गोऱ्हे
Maharashtra

स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्यासाठी विविध पिढ्यांतील लेखिकांचा संवाद आवश्यक : आ. डॉ.नीलम गोऱ्हे

पुण्यात २४ ऑक्टोबरला स्त्रीवादी साहित्य संमेलन; डॉ. छाया महाजन संमेलनाध्यक्ष पुण्यात २४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्त्रीवादी साहित्य संमेलनाचे आयोजन.डॉ.छाया महाजन संमेलनाध्यक्ष; आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विविध पिढ्यांतील लेखिकांच्या संवादातून स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्या साठी पिढ्यांतील लेखिकांचा संवाद आवश्यक; पुण्यात २४ ऑक्टोबरला स्त्रीवादी साहित्य संमेलन Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.१७ ऑक्टोबर : स्त्रियांचे अधिकार, विकास आणि सक्षमीकरण याविषयी स्त्रिया व पुरुषांनी केलेली साहित्यनिर्मिती हा स्त्रीवादी साहित्याचा व्यापक आशय आहे. बदलत्या सामाजिक आणि डिजिटल वास्तवात विविध पिढ्यांतील लेखिकांनी एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. स्त्रीव...