पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन
पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर-मंगळवेढ्यात दुष्काळी संकट; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – भगीरथ भालके पंढरपूर-मंगळवेढा परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत, चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भगीरथ भालके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ : ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेचे नेते भगीरथ भालके यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्...

