Thursday, October 29

Tag: #Malshiras

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चेन स्नॅचिंग सह जनावर चोरीचे गुन्हे उघड,मुद्देमाल जप्त
Crime, Maharashtra, Police

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चेन स्नॅचिंग सह जनावर चोरीचे गुन्हे उघड,मुद्देमाल जप्त

अकलूज | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० सप्टेंबर २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चैन स्नॅचिंग आणि जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे फिर्यादीची आई व आजी झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी व सोन्याचे कर्णफुले चोरून नेली होती. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ३० मे २०२६ रोजी रात्री ११.३० ते ३१ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान गणेशनगर, ता. माळशिरस येथील घरासमोरून चार शेळ्या आणि पाच बोकडे चो...