पंढरपुरात निराधार महिलां साठी पालवी अपना घर; आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गृहप्रवेश
पालवी अपना घर च्या नूतन वास्तूचा गृहप्रवेश; निराधार महिलांना मिळणार सुरक्षिततेचे आणि सन्मानाचे छत पंढरपूरमध्ये प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी अपना घर’च्या नूतन वास्तूचा आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गृहप्रवेश. निराधार महिलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची सुविधा. पालवी अपना घर च्या नूतन वास्तूचा गृहप्रवेश; निराधार महिलांसाठी मायेचे छत उभे वैद्यकीय सुविधा, रस्ता व वीजपुरवठ्यासाठी सहकार्याची ग्वाही पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ सप्टेंबर २०२६ : पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने चंद्रभागा नदीकाठ, घाट तसेच शहरातील विविध भागांत निराधार आणि मनोरुग्ण व्यक्तींना सोडून देण्याचे प्रमाण असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत मनोरुग्ण, निराधार आणि आधाराची गरज असलेल्या महिलांसाठी सुरक्षित निवारा व सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रभा हिरा प्रतिष्...

