Wednesday, October 28

Tag: #SeniorCitizens

वृद्धत्वाचा मूक हुंदका – हक्क,सन्मान आणि आधारासाठी ज्येष्ठ नागरिकांचा संघर्ष
Maharashtra

वृद्धत्वाचा मूक हुंदका – हक्क,सन्मान आणि आधारासाठी ज्येष्ठ नागरिकांचा संघर्ष

ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, पेन्शन, आरोग्य, आर्थिक सुरक्षितता आणि कौटुंबिक आधार यांवर डॉ. सुनील दादा पाटील यांचा विचारप्रवर्तक लेख ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, पेन्शन, वाढती महागाई, आरोग्यसेवा, एकटेपणा आणि कौटुंबिक उपेक्षा यांवर डॉ. सुनील दादा पाटील यांचा विचारप्रवर्तक लेख. वृद्धांना दया नव्हे, सन्मान, आर्थिक सुरक्षितता आणि आपलेपणाचा आधार हवा. ज्या हातांनी पिढ्या घडवल्या, ज्या पावलांनी देशाच्या विकासाच्या वाटेवर आयुष्यभर प्रवास केला, ज्या डोळ्यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हजारो स्वप्ने पाहिली आणि ज्या हृदयाने कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि सुखांचा त्याग केला - त्याच हातांना, त्याच पावलांना आणि त्याच हृदयाला वृद्धापकाळात आधारासाठी का भटकावे लागावे?हा प्रश्न केवळ एखाद्या वृद्ध व्यक्तीचा नाही. हा प्रश्न आपल्या कुटुंबव्यवस्थेचा आहे, आपल्या सामाजिक मूल्यांचा आहे, आपल्या प्रशास...