Wednesday, October 28

गणेशोत्सवानिमित्त कासेगावात रक्तदान शिबिर; ४२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गणेशमूर्तीचे पूजन करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्साहाला सामाजिक कार्याची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिक व युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

IMG_20260917_145622

या शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या सहभागींचा उत्साह वाढविण्यासाठी मंडळाच्यावतीने प्रत्येक रक्तदात्यास स्कूल बॅग भेट देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ धार्मिक कार्यक्रम न घेता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न या माध्यमातून दिसून आला.रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या कार्यक्रमास अध्यक्ष संतोष जानगवळी, उपाध्यक्ष मयुर शिंदे, तसेच शंकर साठे, रेवणसिद्ध साखरे, विजय शिंदे, बाबूशा धोत्रे, दाजी देशमुख, अक्षय साठे, संतोष जगताप, लखन दहिहांडे, अक्षय हैसेकर, प्रतिक खराडे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

IMG_20260917_145943

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक जबाबदारी जपण्याचा संदेश या रक्तदान शिबिरातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *