Thursday, October 29

नवरात्रौत्सवासाठी पंढरपूर पोलीस अलर्ट! मंदिर परिसरात मॉकड्रिल; शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम

नवरात्रौत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून या मॉकड्रिलच्या माध्यमातून रंगीत तालीम करण्यात आली. उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची गर्दी होत असल्याने अचानक जमावाची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांनी कोणत्या पद्धतीने आणि कोणती पावले उचलावीत, याची प्रात्यक्षिकांसह चाचपणी करण्यात आली.

IMG_20261008_064636

शहर पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात ही मॉकड्रिल घेण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत विविध पथकांमध्ये समन्वय साधणे, घटनास्थळी तातडीने पोहोचणे, जमावावर नियंत्रण मिळविणे तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, याचा सराव यावेळी करण्यात आला.

या मॉकड्रिलमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक सावजी, दत्तात्रय लेंडवे यांच्यासह १३ पोलीस ठाणे अंमलदार, शीघ्रकृती दलाचे १० जवान, दंगा नियंत्रण पथकाचे १६ जवान, बॉम्बशोधक व नाशक पथकाचे १० जवान तसेच वाहतूक शाखेचे ६ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त, गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक तयारी केली आहे. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे या मॉकड्रिलमधून स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *