Thursday, October 29

Tag: #पंढरपूरपोलीस

आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त
Crime, Maharashtra, Police

आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.२६ ऑक्टोबर २०२६ : घरातील आजारी आईची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवलेल्या महिलेने घरातील लपवलेल्या चावीचा वापर करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार पंढरपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास करत पंढरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ५.५० तोळे वजनाचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.वनिता समाधान कांबळे रा. टाकळी रोड पंढरपूर असे या प्रकरणातील आरोपी महिलेचे नाव पोलिसांनी दिले आहे. जुन्या कराड नाक्यावरील घरातून दागिने चोरीला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन ज्ञानेश्वर ताटे रा.जुना कराड नाका पंढरपूर यांनी घरातील कपाटात सोन्याचे दागिने ठेवले होते.कपाटाची चावीही घरात ठेवण्यात आली होती. २९ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने कपाटातील ५.५० तोळे वज...
नवरात्रौत्सवासाठी पंढरपूर पोलीस अलर्ट! मंदिर परिसरात मॉकड्रिल; शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम
Maharashtra, Police

नवरात्रौत्सवासाठी पंढरपूर पोलीस अलर्ट! मंदिर परिसरात मॉकड्रिल; शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण आणि बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचे मॉकड्रिल; आपत्कालीन परिस्थितीसाठी शीघ्रकृती दल सज्ज पंढरपुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रिल; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात शीघ्रकृती, दंगा नियंत्रण व बॉम्बशोधक पथकाचा सहभाग. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ७ ऑक्टोबर २०२६ : आगामी शारदीय नवरात्रौत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पंढरपूर शहर पोलीस दल सतर्क झाले आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा अनुचित प्रसंगी पोलीस दल घटनास्थळी किती वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचते, याची चाचपणी करण्यासाठी बुधवारी (दि. ७) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मॉकड्रिल घेण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून या मॉकड्रिलच्या माध...