Tuesday, October 27

दुष्काळ टळावा,शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, महिला सुरक्षित राहाव्यात; डॉ.नीलम गोऱ्हे यांचे देवीचरणी साकडे

IMG_20261019_192533_572


एल नीनोसारख्या हवामानविषयक घटनांमुळे उद्भवू शकणाऱ्या अवर्षणाच्या संकटापासून राज्याचे व देशाचे रक्षण व्हावे, वेळेवर पुरेसा पाऊस पडावा आणि शेती समृद्ध व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभावे,संकटांचा सामना करण्याचे बळ मिळावे आणि कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये, अशी भावना त्यांनी व्यक्त करत महिलां वरील हिंसा व अत्याचार थांबावेत, महिला आणि मुलींना निर्भयपणे जगता यावे तसेच राज्य व देशात शांतता,सुरक्षितता आणि सलोखा नांदावा यासाठी त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले.

श्री रेणुका माता मंदिरातील सौरऊर्जा सुविधेसाठी यापूर्वी निधी दिला होता.मात्र यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले नसल्याचे उत्तर मिळत आहे.त्यामुळे निधीशी संबंधित पत्रव्यवहार आणि प्रशासकीय प्रक्रियेतील त्रुटी शोधून त्या दूर करण्यासाठी व आवश्यक कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

सप्तशृंगगडावरील रोपवे सुविधेच्या धर्तीवर राज्यातील इतर गडांवरील देवस्थानांमध्येही अशा सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असून स्थानिक परिस्थिती व आवश्यक बाबींचा विचार करून रोपवे सुविधा उभारल्यास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि अन्य भाविकांना दर्शनासाठी जाणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.

दौऱ्यादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था उत्तम असल्याचे सांगत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठीच्या सुविधा,महिला सुरक्षा,स्वच्छता, आरोग्य सेवा आणि वाहतूक नियोजनाचा आढावा घेणार आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या कामाची प्रगती व प्रलंबित बाबींची माहिती घेऊन संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *