Tuesday, October 27

पंढरपूरच्या प्रथमेश पाटीलची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयात सत्कार

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रथमेशच्या या यशानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी. जाधव यांच्या हस्ते प्रथमेशचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रथमेशचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी झालेली निवड ही प्रथमेशच्या क्रीडा प्रवासातील महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयासह पंढरपूरचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवावे आणि उच्च स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचा ठसा उमटवावा, या दृष्टीने प्रथमेशचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

IMG_20261027_195213


या सत्कारप्रसंगी शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनिल परमार,प्रा. मनोज खापले,प्रा.विठ्ठल फुले, सेवक ओंकार नेहतराव तसेच महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी प्रथमेशचे अभिनंदन करून त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नोएडा येथे होणाऱ्या स्पर्धेत प्रथमेश कशी कामगिरी करतो, याकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

प्रथमेश पाटीलच्या या यशामुळे पंढरपूरच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून आगामी स्पर्धेत त्याने यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *