Wednesday, October 28

Tag: #PandharpurNews

पंढरपूरच्या प्रथमेश पाटीलची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयात सत्कार
Maharashtra, Sports

पंढरपूरच्या प्रथमेश पाटीलची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयात सत्कार

पंढरपूरच्या प्रथमेशची बॉक्सिंगमध्ये भरारी,अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत निवड पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील बॉक्सिंग पटू प्रथमेश पाटील याची नोएडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धे साठी निवड.प्राचार्य डॉ.बी.टी. जाधव यांच्या हस्ते सत्कार. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील बॉक्सिंग पटू प्रथमेश पाटील याने मानाचा टप्पा गाठला आहे. त्याची उत्तर प्रदेशातील नोएडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात मानाची भर पडली असून प्रथमेश वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रथमेशच्या या यशानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. म...
KEM हॉस्पिटलला अश्विनी पाटील यांचे ₹१०.२५ लाख परत करण्याचे आदेश; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
Maharashtra, Politics

KEM हॉस्पिटलला अश्विनी पाटील यांचे ₹१०.२५ लाख परत करण्याचे आदेश; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

₹१०.२५ लाखांच्या परताव्याचे आदेश! आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर निर्णय १५ दिवसांत १० लाख २५ हजार रुपये परत करण्याचे निर्देश पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : धर्मादाय योजनेअंतर्गत उपचारांचा लाभ न मिळाल्याने पुण्यातील KEM हॉस्पिटलमध्ये १० लाख २५ हजार रुपये भरावे लागलेल्या अश्विनी सोमनाथ पाटील यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धर्मादाय सहआयुक्त तथा देखरेख समितीने संबंधित रुग्णालयाला १० लाख २५ हजार रुपये १५ दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पारित करण्यात आला. आमदार अभिजीत पाटील यांनी विधान सभेच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यासह धर्मादाय सहआयुक्तांकडे लेखी तक्रार करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. विधानसभेत रुग्णांच्या हक्कांचा प्रश्न उपस्थित आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि धर्मादाय योजनेसाठी पात्र असलेल्या रुग...
पंढरपूरमध्ये शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसाठी हालचालींना वेग; दिलीप धोत्रे यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा
Maharashtra

पंढरपूरमध्ये शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसाठी हालचालींना वेग; दिलीप धोत्रे यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा

पंढरपूर येथे शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या मागणीला वेग आला आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी आणि सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा. ग्रामीण विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी,सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी; संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांचे आश्वासन पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर येथे शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पुणे येथील शासकीय विश्रामगृहात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन या महत्त्वपूर्ण मागणीवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान मंत्र्य...
खाऊच्या पैशांपासून बँक खात्यापर्यंत! पंढरपूर अर्बन बँकेने विद्यार्थ्यांना दिला आर्थिक शिस्तीचा धडा
Maharashtra

खाऊच्या पैशांपासून बँक खात्यापर्यंत! पंढरपूर अर्बन बँकेने विद्यार्थ्यांना दिला आर्थिक शिस्तीचा धडा

पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या सहीने बँक खाते अभियान सुरू करण्यात आले. कर्मयोगी विद्यानिकेतन येथे उपक्रमाचा प्रारंभ; बचतीची सवय, आर्थिक शिस्त आणि बँकिंग व्यवहारांचे ज्ञान देण्यावर भर. विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पिगी बँक आणि खाऊचे वाटप. खाऊच्या पैशांतून घडणार आर्थिक शिस्त,पंढरपूर अर्बन बँकेचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम दहा वर्षे व त्यावरील विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या सहीने बँक खाते अभियानाचा प्रारंभ; कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये बचत आणि आर्थिक साक्षरतेचा धडा पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : खिशात मिळणारा खाऊचा पैसा,त्यातून केलेली छोटी बचत आणि स्वतःच्या सहीने चालवलेले बँक खाते… या छोट्या गोष्टींमधून उद्याच्या जबाबदार नागरिकांची आर्थिक जडणघडण होऊ शकते.विद्यार्थ्यां मध्ये लहान वयातच बचतीची सवय आर्थिक शिस्त आणि बँकिंग व्यवहारांची प्राथमिक...
पंढरपूरमध्ये पाणीटंचाईचे सावट! शुक्रवारपासून एक दिवसाआड पाणी;तुमचा भाग कोणत्या दिवशी?
Maharashtra

पंढरपूरमध्ये पाणीटंचाईचे सावट! शुक्रवारपासून एक दिवसाआड पाणी;तुमचा भाग कोणत्या दिवशी?

पंढरपूर शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर २०२६ पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे.रेल्वे रुळा खालील आणि रेल्वे रुळावरील भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर. पाणी जपून वापरण्याचे पंढरपूर नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन. पंढरपूरकरांनो,पाणी जपून वापरा १६ ऑक्टोबरपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचा निर्णय पंढरपूरमध्ये पाणीबचतीची कसोटी! आता एक दिवसाआड नळाला पाणी; नागरिकांनीही जबाबदारी ओळखण्याची वेळ पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑक्टोबर :पाणी हे केवळ नैसर्गिक साधन नाही तर प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जगण्याचा आधार आहे. मात्र पावसाची कमतरता आणि मर्यादित पाणीसाठा यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याची वेळ आता पंढरपूर शहरावर आली आहे. पंढरपूर नगरपरिषदेने जाहीर निवेदनाद्वारे शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ पासून शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा न...
पंढरपुरात स्वच्छतेतून विठ्ठलसेवा अभियानाला लोकसहभागाची ताकद; ७०० जणांच्या श्रमदानातून १८ टन कचरा संकलित
Maharashtra

पंढरपुरात स्वच्छतेतून विठ्ठलसेवा अभियानाला लोकसहभागाची ताकद; ७०० जणांच्या श्रमदानातून १८ टन कचरा संकलित

पंढरपुरात स्वच्छतेतून विठ्ठलसेवा अभियानाला लोकसहभागाची ताकद; ७०० जणांच्या श्रमदानातून १८ टन कचरा संकलित पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात स्वच्छतेतून विठ्ठलसेवा अभियानांतर्गत ७०० जणांनी श्रमदान केले.१८ टन कचरा संकलित; मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे स्वच्छ पंढरपूरसाठी आवाहन. विठ्ठलभक्तीचा अनोखा मार्ग ! चंद्रभागेच्या वाळवंटात ७०० हात एकवटले; १८ टन कचऱ्याची स्वच्छता पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ ऑक्टोबर २०२६ : विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात भक्तीचा भाव असतो; पण ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची पावले पडतात, तो परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही प्रत्येकाची आहे.याच सामाजिक जाणिवेतून पंढरपुरात स्वच्छतेतून विठ्ठलसेवा या अभियानाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.सुमारे ७०० जणांच्या सहभागातून तब्बल १८ टन कचरा संकलित करण्यात आला असून श्रमदानातून भक्...
स्वच्छता अभियानातून 18 टन कचरा संकलित, अभियानात सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक व न.पा कर्मचाऱ्यांचा सहभाग
Maharashtra

स्वच्छता अभियानातून 18 टन कचरा संकलित, अभियानात सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक व न.पा कर्मचाऱ्यांचा सहभाग

चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानात 18 टन कचरा संकलित;स्वच्छता हीच विठ्ठल सेवा चा संदेश पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटात विशेष स्वच्छता अभियान; सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून 18 टन कचरा संकलित. दर बुधवारी श्रमदान अभियान राबविण्याचा निर्णय पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ७ ऑक्टोबर २०२६ :-पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांच्या पुढाकाराने आज चंद्रभागा वाळवंट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानास विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे संख्येने सहभाग नोंदविला. या स्वच्छता अभियानातून तब्बल 18 टन कचरा संकलित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. सदर स्वच्छत...
पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयाचा मार्ग मोकळा? आ.समाधान आवताडेंच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश
Maharashtra

पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयाचा मार्ग मोकळा? आ.समाधान आवताडेंच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश

पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयासाठी आ.समाधान आवताडेंचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश पंढरपुरात स्वतंत्र RTO कार्यालय सुरू करण्यासाठी आमदार समाधान आवताडेंचा पाठपुरावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर येथे स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सुरू करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासना कडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालयास ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत परिवहन विभागाला याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले पडण...
पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन
Maharashtra, Politics

पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ निर्माण झाला आहे ; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या.भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर-मंगळवेढ्यात दुष्काळी संकट; शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – भगीरथ भालके पंढरपूर-मंगळवेढा परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत, चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भगीरथ भालके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ : ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेचे नेते भगीरथ भालके यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्...
शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध
Crime, Police

शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध

शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध सोलापूर जिल्हा परिसरातील सराईत गुन्हेगार शरद विठ्ठल कोळी याच्यावर MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे.याच कारवाईचा भाग म्हणून शरद विठ्ठल कोळी याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले,औषधविक्रेते, धोकादायक व्यक्ती आणि व्हाइट कॉलर गुन्हेगार यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठीचा कायदा अर्थात MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.त्याला ...