Wednesday, October 28

Tag: #MarathiNews

पंढरपूरच्या प्रथमेश पाटीलची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयात सत्कार
Maharashtra, Sports

पंढरपूरच्या प्रथमेश पाटीलची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयात सत्कार

पंढरपूरच्या प्रथमेशची बॉक्सिंगमध्ये भरारी,अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत निवड पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील बॉक्सिंग पटू प्रथमेश पाटील याची नोएडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धे साठी निवड.प्राचार्य डॉ.बी.टी. जाधव यांच्या हस्ते सत्कार. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील बॉक्सिंग पटू प्रथमेश पाटील याने मानाचा टप्पा गाठला आहे. त्याची उत्तर प्रदेशातील नोएडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात मानाची भर पडली असून प्रथमेश वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रथमेशच्या या यशानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. म...
ईव्हीएम नको होतं, तर राजीव गांधींच्या काळात का आणलं? रामदास आठवलेंचा काँग्रेसला सवाल; जरांगेंच्या कथित आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची मागणी
Maharashtra, Politics

ईव्हीएम नको होतं, तर राजीव गांधींच्या काळात का आणलं? रामदास आठवलेंचा काँग्रेसला सवाल; जरांगेंच्या कथित आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची मागणी

ईव्हीएमवरून काँग्रेसला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सवाल. मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची चौकशी, संविधान आणि २०२९ च्या निवडणुकीवरही आठवलेंचे भाष्य. ईव्हीएमवरून रामदास आठवलेंचा काँग्रेसला घेराव; राजीव गांधींच्या काळाचा दिला दाखला,मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या कथित व्यवहारावर आठवले स्पष्टच बोलले; चौकशीची मागणी सत्ता हवी असेल तर २०२९ मध्ये जनतेकडे जा; रामदास आठवलेंचा विरोधकांना सल्ला खेड / मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : ईव्हीएम मशीनवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला आहे. “ईव्हीएम नको होतं, तर राजीव गांधी यांच्या काळात ते का आणलं?असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांच्या भूमिके...
शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली केल्यास फौजदारी गुन्हा; मुख्यमंत्री फडणवीसांचा मायक्रोफायनान्स कंपन्यांना इशारा
Maharashtra, mumbai

शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली केल्यास फौजदारी गुन्हा; मुख्यमंत्री फडणवीसांचा मायक्रोफायनान्स कंपन्यांना इशारा

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दमदाटी करून कर्जवसुली केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्जवसुलीच्या त्रासापासून संरक्षण देण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजारांची अग्रीम मदत राज्यातील दुष्काळग्रस्त सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने निधीसह मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी सर्व पात्र श...
भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; अक्कलकोट, तुळजापूर, मार्डी आणि पंढरपूर येथील देवस्थानांचे दर्शन घेण्याची संधी
Maharashtra

भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; अक्कलकोट, तुळजापूर, मार्डी आणि पंढरपूर येथील देवस्थानांचे दर्शन घेण्याची संधी

नवरात्रोत्सवानिमित्त सरकोलीतील महिलांसाठी स्वर्गीय लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीने मोफत देवदर्शन यात्रा आयोजित.भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवात सरकोलीतील महिलांना मोफत देवदर्शनाची पर्वणी! भगीरथदादा भालके यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक यात्रेचे आयोजन सरकोलीतील महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रा; नवरात्रोत्सवात भक्तीचा जागर Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. सरकोली, ता.पंढरपूर ज्ञानप्रवाह न्यूज : नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेता यावे आणि त्यांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने मौजे सरकोली येथील महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.स्वर्गीय लोकनेते आमदार भारत नाना भालके ...
एलॉन मस्क यांचे प्रिय पंतप्रधान अंबानी ट्विट चर्चेत! स्टारलिंकच्या भारता तील प्रवेशाला नेमका अडथळा कोणाचा? जिओ विरुद्ध स्टारलिंक वादाला नवे वळण
Breaking news

एलॉन मस्क यांचे प्रिय पंतप्रधान अंबानी ट्विट चर्चेत! स्टारलिंकच्या भारता तील प्रवेशाला नेमका अडथळा कोणाचा? जिओ विरुद्ध स्टारलिंक वादाला नवे वळण

एलॉन मस्क यांनी प्रिय पंतप्रधान अंबानी म्हणत स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशातील विलंबावर प्रश्न उपस्थित केले. रिलायन्स जिओ, उपग्रह इंटरनेट सेवा, सरकारी मंजुरी, स्पेक्ट्रम वाटप आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे दूरसंचार क्षेत्रात नवा वाद निर्माण झाला आहे. प्रिय पंतप्रधान अंबानी म्हणत एलॉन मस्क यांचा टोला! स्टारलिंकला भारतात प्रवेश मिळण्यास विलंब का ? जिओ आणि सरकारची भूमिका काय नवी दिल्ली : जगातील आघाडीचे उद्योगपती आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी भारता तील स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवेच्या प्रवेशाला होत असलेल्या विलंबावरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर प्रश्न उपस्थित केले आहेत.डिअर प्राइम मिनिस्टर अंबानी म्हणजेच प्रिय पंतप्रधान अंबानी अशा उपरोधिक संबोधनातून त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या पोस्टमुळे भारतातील दूरसंचार ...
सामाजिक बांधिलकी जोपासणारा सिनेविश्वातील क्रांतिवीर हरपला; नाना पाटेकर यांच्या निधनाने मोठी पोकळी –केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Bollywood, Maharashtra, mumbai

सामाजिक बांधिलकी जोपासणारा सिनेविश्वातील क्रांतिवीर हरपला; नाना पाटेकर यांच्या निधनाने मोठी पोकळी –केंद्रीय मंत्री रामदास आठवले

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली. सामाजिक बांधिलकी जपणारा सिनेविश्वातील क्रांतिवीर हरपल्याची भावना आठवले यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर यांच्या निधनाने सामाजिक बांधिलकी जपणारा क्रांतिवीर हरपला; रामदास आठवले यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.८ ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने सामाजिक बांधिलकी जोपासणारे सिनेविश्वातील क्रांतिवीर व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर हे आदर्श नटसम्राट आणि उत्तुंग कलावंत होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या कला आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुक...