Wednesday, November 11

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरी मंत्र्यांची दिवाळी! शिवेंद्रराजे भोसले यांनी पोपट सावंत कुटुंबाला दिला मदतीचा आधार

IMG_20261108_221934


यावेळी मंत्री श्री.भोसले यांनी सावंत कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ व आहेर देत शुभेच्छा दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या अग्रीम आर्थिक मदत योजनेअंतर्गत पोपट गोविंद सावंत यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. याबद्दल सावंत यांनी समाधान व्यक्त केले.

पोपट सावंत यांच्या कुटुंबात तीन सदस्य असून त्यांच्या नावे १ हेक्टर २६ आर शेतजमीन आहे. या क्षेत्रात मका व बाजरी पिकांची लागवड करण्यात आली होती.पर्जन्यमाना तील तुटवड्यामुळे मक्याचे ०.५० हेक्टर व बाजरीचे ०.५० हेक्टर असे एकूण १ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून शासन निर्णयानुसार त्यांच्या खात्यावर अग्रीम आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.

IMG_20261108_162026


यावेळी मंत्री श्री.भोसले यांनी सावंत कुटुंबीयांशी संवाद साधून शेतीची सद्यस्थिती,पिकांचे नुकसान तसेच शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मदतीबाबत माहिती घेतली.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्याच्या उपक्रमातून शासन शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी असल्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख,तहसीलदार बाळूबाई भागवत,जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *