Thursday, October 29

Tag: #शेतकरीमदत

अहमदपूरमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला रामदास आठवले यांचा आधार;रिपब्लिकन पक्षाकडून ५० हजारांची मदत
Breaking news

अहमदपूरमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला रामदास आठवले यांचा आधार;रिपब्लिकन पक्षाकडून ५० हजारांची मदत

अहमदपूरमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला रामदास आठवले यांचा आधार; रिपब्लिकन पक्षाकडून ५० हजारांची मदत लातूर जिल्ह्यातील खंडाळी येथे देमगुंडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; वृद्ध वडील आणि दोन मुलांचे केले सांत्वन लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी गजानन देमगुंडे यांच्या कुटुंबीयांची रामदास आठवले यांनी भेट घेतली. रिपब्लिकन पक्षाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत. अहमदपूर, लातूर | दि. १८ : दुष्काळामुळे शेतीचे नुकसान झाल्याने आत्महत्या केलेल्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील तरुण शेतकरी गजानन नागोराव देमगुंडे यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देमगुंडे कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. लातूर...
मतचोरी, दुष्काळ आणि पाणी टंचाईवरून प्रणिती शिंदे आक्रमक; सोलापुरात काँग्रेसची मत वाचवा – देश वाचवा रॅली
Maharashtra, Politics

मतचोरी, दुष्काळ आणि पाणी टंचाईवरून प्रणिती शिंदे आक्रमक; सोलापुरात काँग्रेसची मत वाचवा – देश वाचवा रॅली

सोलापुरात मत वाचवा–देश वाचवा अभियानांतर्गत खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची रॅली.मतदार याद्यांतील कथित अनियमितता,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अपुरी मदत आणि शहरातील अनियमित पाणी पुरवठ्यावरून भाजप सरकारवर टीका; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; शेतकऱ्यांना भरघोस मदत व सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठ्याची मागणी सोलापूर ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ ऑक्टोबर २०२६ : मतदार याद्यां मधील कथित अनियमितता, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि सोलापूर शहरातील अनियमित पाणीपुरवठा या मुद्द्यांवरून खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मत वाचवा–देश वाचवा अभियानांतर्गत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रॅ...
डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवा तून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; एकनाथ शिंदेंकडून दिवाळी शिध्याचे ट्रक पाठविण्याची घोषणा
Maharashtra, mumbai

डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवा तून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; एकनाथ शिंदेंकडून दिवाळी शिध्याचे ट्रक पाठविण्याची घोषणा

डोंबिवलीत डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा पाठविण्याची घोषणा; उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश भक्तीचा उत्सव,बळीराजासाठी मदतीचा संकल्प! डोंबिवलीच्या नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श डोंबिवली | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना उत्सवातील भपका आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी हात पुढे करणारा डोंबिवलीतील नवरात्रोत्सव यंदा सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आहे. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन देवीच...
मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; आमदार समाधान आवताडे यांची मागणी
Maharashtra

मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; आमदार समाधान आवताडे यांची मागणी

मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; आमदार समाधान आवताडे यांची मागणी केंद्रीय पथकप्रमुख डॉ.के. पोनुसामी यांच्याकडे १७ मागण्यांचे निवेदन; फळबागांसाठी हेक्टरी १.२५ लाखांचे विशेष पॅकेज आणि दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाची मागणी मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई, फळबागांसाठी हेक्टरी १.२५ लाखांचे पॅकेज आणि दिवाळी पूर्वी अनुदान द्यावे, अशी आमदार समाधान आवताडे यांची केंद्रीय पथकाकडे १७ मागण्यांची निवेदनाद्वारे मागणी. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, फळबागांसाठी हेक्टरी किमान १ लाख २५ हजार रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे आणि दुष्काळ अनुदानाचे वाटप दिवाळीपूर्वी करावे, अशा १७ महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन आमदार समाधान आवताडे यांन...
२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; शेतकऱ्यांना कर्ज वसुली स्थगिती,वीजबिलात सवलत, पंचनामे तातडीने – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maharashtra, mumbai

२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; शेतकऱ्यांना कर्ज वसुली स्थगिती,वीजबिलात सवलत, पंचनामे तातडीने – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना जमीन महसूल सूट, पीक कर्ज पुनर्गठन, वीजबिल सवलत आणि कर्जवसुलीस स्थगिती. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश. मुंबई,दि.२६ सप्टेंबर २०२६ : संकटाच्या प्रत्येक काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आताही दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनाच आमचे संपूर्ण प्राधान्य राहील, अशी ग्वाही देतानाच आम्ही दिलेला शब्द पाळणारे असून २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून त्यासाठीच्या उपाययोजना आणि विशेष सवलती जाहीर केल्याचे सांगत शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देतांना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्यमत्र्यांस...
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज-आमदार सत्यजीत तांबे
Breaking news

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज-आमदार सत्यजीत तांबे

पावसाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनांना गती देण्याची मागणी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मदत शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा; सत्यजीत तांबे यांचा शासनाला आग्रह महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत, पाणी, चारा, वीज आणि आवश्यक सवलतींचा लाभ वेळेत मिळावा,अशी मागणी केली. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाणी, शेतीसाठी पाणी आणि वीजपुरवठ्यासह विविध उपाययोजनांना गती देण्याची गरज असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. मुंबई, दि. २६ सप्टेंबर २०२६ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून दुष्काळी भागांसाठी जाही...