Thursday, October 29

पंढरपूर विधानसभा मतदार संघात मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिरे; १९,२०,२६ व २७ सप्टेंबरला आयोजन

मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी याबाबत माहिती दिली.

चार दिवस सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

पंढरपूर विधानसभा मतदारसंघा तील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ही शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रांवर वेळेत उपस्थित राहून नागरिकां कडून मतदार नोंदणी, मतदार यादीतील माहिती दुरुस्ती तसेच अपात्र अथवा संबंधित नोंदी वगळण्यासाठी आवश्यक अर्ज स्वीकारण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

कोणत्या कामासाठी कोणता अर्ज ?

मतदार यादीमध्ये नाव नोंदविणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळणे यासाठी संबंधित नमुना अर्ज नागरिकांना शिबिरात भरता येणार आहे.

  • नमुना क्र. ६ : नव्याने मतदार नोंदणीसाठी. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र नागरिक अर्ज करू शकतात.
  • नमुना क्र. ७ : मतदार यादीतील चुकीची, तसेच मयत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यासाठी.
  • नमुना क्र. ८ : नाव, वय, लिंग, नातेसंबंध, पत्ता आदी मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती किंवा बदल करण्यासाठी.

नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, पात्र नागरिक मतदार यादीत नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघा तील नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरात सहभागी होऊन मतदार यादीतील आपले नाव व इतर नोंदी तपासून आवश्यक असल्यास त्या अद्ययावत करून घ्याव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *