Thursday, October 29

Tag: #ज्ञानप्रवाहन्यूज

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!
Maharashtra, mumbai

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!

पुण्यातील स्त्रीवादी साहित्य संमेलनात मी का लिहिते? परिसंवादातून सात लेखिकांनी मांडल्या लेखनप्रेरणा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांचे लेखन सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरण्याची गरज व्यक्त केली. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क,दि. २४ ऑक्टोबर : अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, ग्रामीण आणि बहुजन स्त्रियांच्या जगण्याला शब्द देण्यासाठी, स्त्रीवादाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी आणि मूक प्राण्यांच्या वेदना समाजासमोर आणण्यासाठी आम्ही लिहितो, अशा विविध लेखनप्रेरणांचा उलगडा पुण्यातील स्त्रीवादी साहित्य संमेलनात झाला. ‘मी का लिहिते? या विशेष परिसंवादात सात लेखिकांनी आपल्या लेखन प्रवासातील अनुभव मांडत साहित्य हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून सामाजिक वास्तवाची नोंद घेणारी आणि परिवर्तनाची दिशा दाखवणारी कृती असल्याचे अधोरेखित केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर ...
ईव्हीएम नको होतं, तर राजीव गांधींच्या काळात का आणलं? रामदास आठवलेंचा काँग्रेसला सवाल; जरांगेंच्या कथित आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची मागणी
Maharashtra, Politics

ईव्हीएम नको होतं, तर राजीव गांधींच्या काळात का आणलं? रामदास आठवलेंचा काँग्रेसला सवाल; जरांगेंच्या कथित आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची मागणी

ईव्हीएमवरून काँग्रेसला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सवाल. मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची चौकशी, संविधान आणि २०२९ च्या निवडणुकीवरही आठवलेंचे भाष्य. ईव्हीएमवरून रामदास आठवलेंचा काँग्रेसला घेराव; राजीव गांधींच्या काळाचा दिला दाखला,मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या कथित व्यवहारावर आठवले स्पष्टच बोलले; चौकशीची मागणी सत्ता हवी असेल तर २०२९ मध्ये जनतेकडे जा; रामदास आठवलेंचा विरोधकांना सल्ला खेड / मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : ईव्हीएम मशीनवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला आहे. “ईव्हीएम नको होतं, तर राजीव गांधी यांच्या काळात ते का आणलं?असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांच्या भूमिके...
तेलंगणाच्या धरणाची उंची वाढणार? फडणवीसांनी स्पष्ट केली महाराष्ट्राची भूमिका महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड नाही
Maharashtra, mumbai

तेलंगणाच्या धरणाची उंची वाढणार? फडणवीसांनी स्पष्ट केली महाराष्ट्राची भूमिका महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड नाही

तेलंगणाच्या थुमिडीहेट्टी जलसंपदा प्रकल्पाची उंची १४८ वरून १५२ मीटर करण्याच्या प्रस्तावाचा महाराष्ट्र स्वतंत्र अभ्यास करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्या साठी संयुक्त समितीची घोषणा. तेलंगणाच्या प्रकल्पाला सहकार्य, पण महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड नाही! थुमिडीहेट्टी धरणाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय थुमिडीहेट्टी प्रकल्पावर महाराष्ट्राचा मोठा निर्णय; बुडीत क्षेत्राचा स्वतंत्र अभ्यास होणार मुंबई | दि. २६ ऑक्टोबर २०२६ | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : तेलंगणाच्या थुमिडीहेट्टी जलसंपदा प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावावर महाराष्ट्राने सावध आणि सकारात्मक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करत तेलंगणाला सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील संभाव्य बुडीत क्षेत्र, अभयारण्या...
निसर्गाची कत्तल चालते, पण चार छत्र्यांसाठी रेल्वेच अडते! विकासाचा हा कुठला न्याय ?– आमदार सत्यजीत तांबे
Maharashtra, Politics

निसर्गाची कत्तल चालते, पण चार छत्र्यांसाठी रेल्वेच अडते! विकासाचा हा कुठला न्याय ?– आमदार सत्यजीत तांबे

भिमाशंकरपासून नाशिकपर्यंत वृक्षतोडीवरून संताप; पुणे– नाशिक सरळ रेल्वेमार्गाच्या अडथळ्यांवर तांबे यांचा सवाल भिमाशंकर आणि नाशिकमधील वृक्षतोडीवरून आमदार सत्यजीत तांबे आक्रमक. चार छत्र्यांसाठी पुणे–नाशिक सरळ रेल्वेमार्ग अडत असल्याच्या मुद्द्यावरून विकासाच्या प्राधान्यक्रमांवर सवाल. नाशिक | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल सुरू असताना, दुसरीकडे अवघ्या चार छत्र्यांच्या मुद्द्यावरून पुणे–नाशिक सरळ रेल्वेमार्गा सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडवला जात असेल, तर हा विकासाचा नेमका कोणता न्याय? असा संतप्त सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.भिमाशंकरपासून नाशिक पर्यंत सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि विकासाच्या प्राधान्यक्रमां बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. भिमाशंकरसारख्या पवित्र आणि निसर्गसमृद्ध परिसरात विविध प्रक...
आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त
Crime, Maharashtra, Police

आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवले पण घरातील सोन्याचे दागिने चोरीला,पंढरपूर पोलिसांची कारवाई; ५.५० तोळे सोने जप्त

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.२६ ऑक्टोबर २०२६ : घरातील आजारी आईची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवलेल्या महिलेने घरातील लपवलेल्या चावीचा वापर करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार पंढरपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास करत पंढरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ५.५० तोळे वजनाचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.वनिता समाधान कांबळे रा. टाकळी रोड पंढरपूर असे या प्रकरणातील आरोपी महिलेचे नाव पोलिसांनी दिले आहे. जुन्या कराड नाक्यावरील घरातून दागिने चोरीला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन ज्ञानेश्वर ताटे रा.जुना कराड नाका पंढरपूर यांनी घरातील कपाटात सोन्याचे दागिने ठेवले होते.कपाटाची चावीही घरात ठेवण्यात आली होती. २९ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने कपाटातील ५.५० तोळे वज...
Maharashtra

मंगळवेढ्यात ४,७७७ रेशन कार्डांचा मुद्दा पेटला! प्रणिती शिंदे मैदानात; धान्यपुरवठा सुरू करण्याची मागणी

मंगळवेढा तालुक्यात मिशन सुधार अंतर्गत बंद केलेली ४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करून नियमित धान्य पुरवठा सुरू करण्याच्या मागणी साठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. ४,७७७ रेशन कार्डे बंद; गरीब कुटुंबांच्या ताटातील धान्याचा प्रश्न ऐरणीवर! मंगळवेढ्यात प्रणिती शिंदे यांचे धरणे आंदोलन मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.२६ ऑक्टोबर २०२६ :दुष्काळाचे संकट, पिण्याच्या पाण्याची चिंता आणि त्यात रेशनच्या धान्यापासून वंचित राहण्याची वेळ! मंगळवेढा तालुक्यात मिशन सुधार योजनेंतर्गत बंद करण्यात आलेली सुमारे ४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करून लाभार्थ्यांना नियमित धान्य पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्यावतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात ...
वृद्धत्वाचा मूक हुंदका – हक्क,सन्मान आणि आधारासाठी ज्येष्ठ नागरिकांचा संघर्ष
Maharashtra

वृद्धत्वाचा मूक हुंदका – हक्क,सन्मान आणि आधारासाठी ज्येष्ठ नागरिकांचा संघर्ष

ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, पेन्शन, आरोग्य, आर्थिक सुरक्षितता आणि कौटुंबिक आधार यांवर डॉ. सुनील दादा पाटील यांचा विचारप्रवर्तक लेख ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, पेन्शन, वाढती महागाई, आरोग्यसेवा, एकटेपणा आणि कौटुंबिक उपेक्षा यांवर डॉ. सुनील दादा पाटील यांचा विचारप्रवर्तक लेख. वृद्धांना दया नव्हे, सन्मान, आर्थिक सुरक्षितता आणि आपलेपणाचा आधार हवा. ज्या हातांनी पिढ्या घडवल्या, ज्या पावलांनी देशाच्या विकासाच्या वाटेवर आयुष्यभर प्रवास केला, ज्या डोळ्यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हजारो स्वप्ने पाहिली आणि ज्या हृदयाने कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि सुखांचा त्याग केला - त्याच हातांना, त्याच पावलांना आणि त्याच हृदयाला वृद्धापकाळात आधारासाठी का भटकावे लागावे?हा प्रश्न केवळ एखाद्या वृद्ध व्यक्तीचा नाही. हा प्रश्न आपल्या कुटुंबव्यवस्थेचा आहे, आपल्या सामाजिक मूल्यांचा आहे, आपल्या प्रशास...
दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला द्या साथ,अवघ्या ५० रुपयांत खरेदी करा आकर्षक मेणपणत्या; स्वावलंबनाच्या दिशेने उजळवा आशेचा दीप
Maharashtra

दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला द्या साथ,अवघ्या ५० रुपयांत खरेदी करा आकर्षक मेणपणत्या; स्वावलंबनाच्या दिशेने उजळवा आशेचा दीप

दहा मेणपणत्या फक्त ५० रुपयांत! पंढरपूरच्या दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला साथ देण्याची संधी पंढरपूरच्या शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी आकर्षक मेणपणत्या व मेणबत्त्या तयार केल्या आहेत. १० मेणपणत्यांचे पाकीट फक्त ५० रुपयांत उपलब्ध असून, खरेदीतून विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाला बळ देण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष मुन्नागिर गोसावी यांनी केले आहे. दिव्यांगत्वावर मात करत कलेतून स्वावलंबनाची भरारी! पंढरपूर | dnyanpravahnews : अंधारावर मात करून प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिव्यांची निर्मिती आता दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कुशल हातांतून होत आहे. पंढरपूर येथील लायन्स क्लब पंढरपूर यांच्या अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला कौशल्याची जोड देत विविध प्रकारच्या आकर्षक मेणपणत्या आणि मेणबत्त्य...
शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध
Crime, Police

शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध

शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध सोलापूर जिल्हा परिसरातील सराईत गुन्हेगार शरद विठ्ठल कोळी याच्यावर MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे.याच कारवाईचा भाग म्हणून शरद विठ्ठल कोळी याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले,औषधविक्रेते, धोकादायक व्यक्ती आणि व्हाइट कॉलर गुन्हेगार यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठीचा कायदा अर्थात MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.त्याला ...
पंढरपूर विधानसभा मतदार संघात मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिरे; १९,२०,२६ व २७ सप्टेंबरला आयोजन
BY- Elections, Maharashtra

पंढरपूर विधानसभा मतदार संघात मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिरे; १९,२०,२६ व २७ सप्टेंबरला आयोजन

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिरे; १९,२०,२६ व २७ सप्टेंबरला आयोजन पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज | दि. १६ सप्टेंबर २०२६ : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पात्र नागरिकांची, विशेषतः नवमतदार, महिला आणि दिव्यांग नागरिकांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी याबाबत माहिती दिली. चार दिवस सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे पंढरपूर विधानसभा मतदारसंघा तील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ही शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ...