
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लंडन दौऱ्यावर रवाना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेसह बिझनेस समिट, पुरस्कार सोहळे आणि विविध मान्यवरांशी संवाद साधणार.
रामदास आठवले लंडनला रवाना; डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख अतिथी
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा लंडन दौरा;आंबेडकर स्मारकाला देणार भेट, विविध कार्यक्रमांना उपस्थिती.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले लंडनला रवाना
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ सप्टेंबर २०२६ :रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज पहाटे मुंबईहून लंडन दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यांच्या पाच दिवसांच्या लंडन दौऱ्यात पत्नी सीमाताई आठवले आणि पुत्र जीत आठवले हेही त्यांच्यासोबत आहेत.
रामदास आठवले यांचा लंडन दौरा १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, २३ सप्टेंबर २०२६ रोजी ते मुंबईत परतणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख अतिथी
लंडन दौऱ्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेत रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि सामाजिक योगदानाचा विविध अंगांनी विचार केला जाणार आहे.
बिझनेस समिट आणि पुरस्कार सोहळ्यांना उपस्थिती
दौऱ्यादरम्यान रामदास आठवले विविध बिझनेस समिट तसेच पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहणार आहेत. लंडनमधील उद्योग जगताशी संबंधित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि पत्रकार यांच्याशीही ते संवाद साधणार आहेत.
या संवादातून सामाजिक न्याय, सामाजिक कार्य तसेच विविध क्षेत्रां तील घडामोडींवर विचारविनिमय होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट
लंडनमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालाही रामदास आठवले भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे.
