Wednesday, October 28

Tag: Dnyanpravah news

महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून सावरण्याची शक्ती दे,श्री इच्छापूर्ती गणरायाच्या चरणी आमदार सत्यजीत तांबे यांची प्रार्थना
Maharashtra

महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून सावरण्याची शक्ती दे,श्री इच्छापूर्ती गणरायाच्या चरणी आमदार सत्यजीत तांबे यांची प्रार्थना

संगमनेरच्या १३१ वर्षांच्या वैभवशाली परंपरेचा मानाचा श्री इच्छापूर्ती गणेश विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात संगमनेरच्या १३१ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेतील मानाच्या श्री इच्छापूर्ती गणेशाची विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली. आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी, अशी गणरायाकडे प्रार्थना केली. पारंपरिक वाद्यांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि पर्यावरणपूरक विसर्जनाने सोहळ्याला विशेष रंगत आली. संगमनेर, दि. २५ सप्टेंबर २०२६ : संगमनेर शहरातील १३१ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मानाच्या श्री इच्छापूर्ती गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील रंगार गल्ली येथील सोमेश्वर मित्र मंडळाच्या या ऐतिहासिक गणेशोत्सवाला यंदाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. Lorem Ipsum has been...
IIT मुंबईतील साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावर रामदास आठवले आक्रमक; प्रा. डुल्लांना निलंबित करण्याची मागणी
Maharashtra, mumbai, Politics

IIT मुंबईतील साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावर रामदास आठवले आक्रमक; प्रा. डुल्लांना निलंबित करण्याची मागणी

पवई IIT विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा;प्रा.सूर्यनारायण डुल्लांना निलंबित करण्याची रामदास आठवले यांची मागणी साहिल वाकोडे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; IIT मुंबईत रामदास आठवले यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२५ सप्टेंबर २०२६ : पवई येथील IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना निलंबित करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. रामदास आठवले यांनी शुक्रवारी IIT मुंबईला भेट देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चौकशीबाबत माहिती घेण्यात आली. बैठकीला IIT मुंबई...
गौरी पूजनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुवर्ण अलंकारांची झळाळी; मनोहारी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी
Maharashtra

गौरी पूजनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुवर्ण अलंकारांची झळाळी; मनोहारी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी

श्री गौरी पूजनानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठल, रुक्मिणी माता व महालक्ष्मी मातेस पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी गौरी पूजनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुवर्ण अलंकारांची झळाळी; मनोहारी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. सोन्याचा मुकुट,चंद्रहार,लक्ष्मीहार अन् हिऱ्याचे कंगन; गौरी पूजना निमित्त विठ्ठल-रुक्मिणी - महालक्ष्मीचे विलोभनीय रूप पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ सप्टेंबर २०२६ : श्री गौरी पूजना निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल,रुक्मिणी माता आणि महालक्ष्मी मातेस आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले.सुवर्ण अलंकारांनी नटलेले तिन्ही देवतांचे मनोहारी रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी मंदिरात भाविकांची ...
बाप्पाचा निरोपही पर्यावरणपूरक! प्रभा निवासस्थानी घरच्या घरी हौदात गणेश विसर्जन
Maharashtra

बाप्पाचा निरोपही पर्यावरणपूरक! प्रभा निवासस्थानी घरच्या घरी हौदात गणेश विसर्जन

संगमनेर येथील प्रभा निवासस्थानी आमदार सत्यजीत तांबे आणि डॉ. मैथिली तांबे यांनी घरच्या घरी हौद तयार करून गणेश विसर्जन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत जलप्रदूषण टाळण्याचे केले आवाहन जलप्रदूषण टाळण्यासाठी तांबे परिवाराचा आदर्श! घरच्या हौदात गणरायाला भावपूर्ण निरोप संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १८ सप्टेंबर २०२६ : आज तांबे परिवाराने प्रभा या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात पर्यावरण पूरक पद्धतीने निरोप दिला.यावेळी आमदार सत्यजीत तांबे आणि संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ.मैथिली सत्यजीत तांबे यांनी घरीच हौद तयार करून त्यामध्ये गणरायाचे विसर्जन केले. गेल्या पाच दिवसांपासून प्रभा निवासस्थानी गणरायाच्या आगमनामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. यंदाचा गणेशोत्सव तांबे पर...
रामदास आठवले लंडनला रवाना; डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख अतिथी
Maharashtra, mumbai

रामदास आठवले लंडनला रवाना; डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख अतिथी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लंडन दौऱ्यावर रवाना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेसह बिझनेस समिट, पुरस्कार सोहळे आणि विविध मान्यवरांशी संवाद साधणार. रामदास आठवले लंडनला रवाना; डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख अतिथी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा लंडन दौरा;आंबेडकर स्मारकाला देणार भेट, विविध कार्यक्रमांना उपस्थिती.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले लंडनला रवाना मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ सप्टेंबर २०२६ : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज पहाटे मुंबईहून लंडन दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यांच्या पाच दिवसांच्या लंडन दौऱ्यात पत्नी सीमाताई आठवले आणि पुत्र जीत आठवले हेही त्यांच्यासोबत आहेत. रामदास आठवले यांचा लंडन दौरा १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, २३...
१९८० चा ट्रेंड की गोपनीयतेचा धोका?; फोटो एडिट करणाऱ्या थर्ड पार्टी ॲप्सपासून सावध राहण्याचे ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन
Cyber Crime, Legal Awareness

१९८० चा ट्रेंड की गोपनीयतेचा धोका?; फोटो एडिट करणाऱ्या थर्ड पार्टी ॲप्सपासून सावध राहण्याचे ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन

एक फोटो अपलोड करताना फक्त चेहरा जात नाही! ८० च्या ट्रेंड’वर ॲड.चैतन्य भंडारी यांचा गंभीर इशारा १९८० च्या दशकातील फोटो ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल; थर्ड पार्टी ॲपवर फोटो अपलोड करण्याच्या धोक्याबाबत ॲड. चैतन्य भंडारी यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. धुळे | ज्ञानप्रवाह न्यूज : सोशल मीडियावर सध्या जुन्या काळातील छायाचित्रांसारखा लूक देण्याचा, विशेषतः १९८० च्या दशकाचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाईपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण आपले फोटो विविध थर्ड पार्टी ॲप्लिकेशनवर अपलोड करून त्यांना जुन्या काळातील लूक देत आहेत.मात्र हा ट्रेंड फॉलो करताना वैयक्तिक गोपनीयतेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा ॲड.चैतन्य भंडारी यांनी दिला आहे. आज सोशल मीडियावर एखादा फोटो वेगळ्या स्टाईलमध्ये तयार करून घेणे अत्यंत सोपे झाले आहे. संबंधित ॲपमध्ये फोटो अपलोड करून व...
पत्रकारितेत करिअरची नवी दिशा!पंढरपुरात नवोदित पत्रकारांसाठी विशेष वृत्तलेखन कार्यशाळा
Maharashtra

पत्रकारितेत करिअरची नवी दिशा!पंढरपुरात नवोदित पत्रकारांसाठी विशेष वृत्तलेखन कार्यशाळा

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचा पुढाकार; नामांकित प्राध्यापकांचे मार्गदर्शन पंढरपुरात २० सप्टेंबरला जिल्हास्तरीय वृत्तलेखन कार्यशाळा; नवोदित पत्रकारांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज :आधुनिक डिजिटल युगात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण प्रवेश करत आहेत. गुणवत्ता, उत्साह आणि नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी असली तरी वस्तुनिष्ठ,अचूक कौशल्यपूर्ण पत्रकारितेसाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.याच पार्श्वभूमीवर नवोदित पत्रकारांना वृत्तलेखनाचे तंत्र, बातमीची मांडणी तसेच डिजिटल माध्यमातील बदलांची माहिती करून देण्यासाठी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हास्तरीय वृत्तलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवार २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पंढरपूर...